* छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जटपुरा गेट किंवा गांधी चौक येथे जागा देण्याची मागणी *

0
53

======================

 

 * छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे भव्य धरणे आंदोलन *     

====≠====================

अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये एकही स्मारक नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहराच्या केंद्रस्थानी उभारण्यात यावा याकरिता दिपक बेले यांचे नेतृत्वात मागील 20 वर्षांपासून छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळ प्रयत्न करीत आहे . जटपुरा गेट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता जागा देण्यात यावी या हेतूने मंडळांने आजपावतो प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला.जटपुरा गेट येथील महानगरपालिकेच्या संकुलासमोर पुतळा उभारण्याबाबत महानगरपालिकेच्या आमसभेत सर्वानुमते ठराव सुद्धा घेण्यात आला. मात्र पुरातत्व विभागाचा नियम आड येत असल्याने जटपूरा गेट येथील जागेला मंजुरी देण्यास प्रशासन टाळाटाळ करित आहे.

======================

 * तर गांधी चौक येथील जागा तात्काळ देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन *.  

======================

मागील 20 वर्षांपासून पाठपुरावा व प्रयत्न करूनही जागेचा प्रश्न सुटत नसल्याने छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळाने गांधी चौक येथील जागेचा पर्याय प्रशासनाला दिला. गांधी चौक येथे मनपा इमारतीला लागून असलेल्या वाहनतळाच्या सुरुवातीला छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता प्रशासनाने तात्काळ जागा मंजूर करावी अशी मागणी स्मारक मंडळांने केली. दोन दशकापासून शहरांमध्ये प्रयत्न करूनही शहरात छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळा शहरातील केंद्रस्थानी उभारण्यात यावा ही तमाम शिवभक्तांची भावना आहे.या भावनेची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ मनपा इमारतीच्या बाजूच्या जागेला मंजुरी द्यावी किंवा जटपुरा गेट येथील जागे करिता पुरातत्व विभागाकडून तातडीने शिथिलता द्यावी या मागणीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत भव्य धरणे आंदोलन करण्यात आले
.पुढील 15 दिवसात जागेच्या मुद्द्यावर तोडगा न काढल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मागणी करिता चंद्रपूर बंदची हाक देण्यात येईल असा इशारा यावेळी स्मारक मंडळातर्फे प्रशासनाला देण्यात आला. धरणे आंदोलनानंतर स्मारक मंडळाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन दिले.
आजच्या धरणे कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित दीपक बेले, संदीप गिरे शिवसेना जिल्हाप्रमुख, पप्पू देशमुख, गजाननराव गावंडे गुरुजी,सुनील चोपडे, शैलेश जुमडे, प्रतिमा ठाकूर ,भरत गुप्ता, निमेष मानकर, उज्वलाताई नलगे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख, देवेंद्र बेले,स्वप्निल काशीकर दिलीप रिंगणे, राहुल बेले आकाश साखरकर, महेश काहीलकर, सुनील काळे,निलेश बेलखेडे, अक्षय बेलखेडे, भगतसिंग मालुसरे, नीलिमाताई शिरे,कुसुमताई उदार, प्रणोती निंबाळकर, एडवोकेट अर्चना महाजन, करण वैरागडे, नितेश जुमडे ,रवी लोणकर, मनोज बेले,तुषार लांजेवार इत्यादी अनेक शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.

======================≠==

आपला विनित
दिपक भाऊ बेले
अध्यक्ष छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळ चंद्रपूर.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here