*चंद्रपुरातील रामभक्तांचे अयोध्येत असणार रामनाम जप खाते कॅबिनेट मंत्री मुनगंटीवार यांची घोषणा*

0
38

====================

*गुढीपाडवा पर्वावर 10 हजार रामनाम जप लिखाण पुस्तिकेचे झाले वाटप *
======================
रामजन्मभूमीचा मुद्दा सन1523 पासून प्रलंबित होता.ही लढाई आता संपली आहे.1 जानेवारी 2024 ला ही लढाई संपेल आणि देश विदेशातील कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होईल.या भव्य मंदिरासाठी लागणारे सागवान(काष्ठ)लाकूड चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील असणार आहे.या काष्ठ सोबत10 हजार रामभक्तांनीं लिहिलेल्या एक कोटी रामनामाचा जाप लिहिलेल्या 10 हजार पुस्तिका पाठविण्यात येणार आहे.या काष्ठ सोबत रामाच्या नावाचा प्रवास व्हावा.या पुस्तिकेच्या माध्यमातून अयोध्येतील रामनाम जपाच्या बँकेत चंद्रपुरातील रामनाम जपाचे 10 हजार खाते उघडले जातील,अशी घोषणा कॅबिनेट व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठ पूजन व शोभायात्रा समिती  चंद्रपूर तर्फे आयोजित रामनामजाप पुस्तिकेचे वितरण सोहळ्यात बुधवारी 22 मार्चला केली.
यावेळी मंचावर भागवताचार्य मनिष महाराज,भजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री सुभाष कासंगोट्टुवार, ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,माजी महापौर अंजली घोटेकर,राखी कंचर्लावार,माजी उपमहापौर राहुल पावडे,प्रकाश धारणे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी हिंदू नववर्षप्रारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीचे व प्रभुरामाचे पूजन ना.मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले.तद्नंतर रामनाम जप लिखाण पुस्तिकेचे पूजन करून पुस्तिका वितरित करण्यात आल्या.यावेळी भाजपा नेते राजेंद्र गांधी,संजय कंचर्लावार,किरण बुटले,छबु वैरागडे,शीला चव्हाण,मुन्ना तिवारी,लीलावती रविदास,रामकुमार अकापल्लीवार,रवी आसवानी,अरुण तिखे,सविता कांबळे, ऍड हरीश मनचलवार,डॉ शैलेंद्र शुक्ला आदींची उपस्थिती होती.
============================
टप्याटप्याने रवाना होईल 1800 क्यूबिक मीटर काष्ठ
==========================

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राममंदिरात सागवान (काष्ठ)लाकडाचा वापर केला जाणार आहे.मंदिराचे महाद्वार या  जिल्ह्यातीलचं काष्ठ पासून तयार करण्यात येणार आहे.या काष्ठचे पूजन करून ते अयोध्येला रवाना करण्यात येईल.मंदिरासाठी एकूण 1800 क्यूबिक मीटर काष्ठ पाठविले जाईल,त्याची पहिली खेप 29 मार्चला रवाना होईल,यावेळी आग्रा व काशी विश्वनाथ येथील मंत्री उपस्थित राहतील अशी माहिती ना.मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

===========================
*नाशिकला सुरू होणार गंगा आरती*
=======================
प्रभु श्रीराम वनवासात असतांना त्यांच्या पादस्पर्षाने येथील भूमी पावन झाली.नाशिक मध्ये पंचवटी,तर विदर्भात जंगल म्हणजे तेव्हाचे दंडकारण्यात त्यांचा वनवास याचे अनेक दाखले आहेत.प्रभू रामाचे नाते महाराष्ट्रच्या पावन भूमीशी असल्याने नाशिक मध्ये लवकरच गंगा आरती सुरू करणार असल्याची माहिती ना.मुनगंटीवार यांनी दिली.

==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here