=====================
* आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न, विकासकामांना मिळणार गती *
========================
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून शहरातील महत्वाच्या विकासकामांसाठी प्रादेशिक विकास योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून चंद्रपूर–नागपूर मार्गावर भव्य प्रवेशव्दार, प्रियदर्शनी चौक आणि जुना वरोरा नाका चौक येथे सौंदर्यीकरण आणि महाकाली पोलीस चौकी समोरील शहीद हेमंत करकरे चौक येथे सौंदर्यीकरण आदी कामे करण्यात येणार आहे.
=======================
चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी विविध विभागाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मतदार संघातील अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. चंद्रपूर मतदार संघात ९ अभ्यासिकांचे कामे मंजुर झाली असून तीन अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले आहे. तर ६ समाज भवनाची कामे मंजूर करण्यात आली आहे.
==========================
नुकतेच विशेष रस्ते निधी अंतर्गत दुर्लक्षित असलेल्या शहरातील हिंग्लाज भवानी वार्डाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. तर प्रादेशिक विकास योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रादेशिक विकास योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून २ कोटी रुपये खर्च करून चंद्रपूर–नागपूर मार्गावर भव्य. प्रवेशव्दार उभारण्यात येणार असून चंद्रपूरमध्ये दाखल होताच सुंदर असे भव्य प्रवेशव्दार नजरेस पडणार आहे. तर प्रियदर्शनी चौक आणि जुना वरोरा नाका चौक येथे सौंदर्यीकरणासाठी २ कोटी रुपयांचा निधी खर्च केल्या जाणार आहे. या निधीतून येथे आकर्षक रोषणाईसह इतर सौंदर्यीकरणाची कामे केल्या जाणार आहे. महाकाली पोलीस चौकी समोरील शहीद हेमंत करकरे चौकातील सौंदर्यीकरणासाठी सदर निधीतील १ कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे. होणार असलेल्या या कामांमुळे चंद्रपुरातील सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793