* शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांनी मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार *

0
35

=====================

* अधिवेशनात उचलला होता विषयथकीत वेतन होणार अदा *

=============÷÷÷÷÷÷÷=====

शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयातील 336 कंत्राटी कामगारांचे  थकीत असलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत केली होती. या मागणीची दखल घेण्यात आली असुन सदर कामगारांचे  थकीत  वेतन अदा करण्यात आदेश शासनाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यामुळे सदर कामगारांनी राजमाता निवासस्थानी येत आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत आभार मानले आहे.
मुंबई येथे नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील अनेक महत्वांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. चंद्रपूर मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी अनेक मागण्या सभागृहात बोलताना केल्या आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील दुरावस्था सभागृहाच्या लक्षात आणुन देण्यासाठी त्यांनी लक्षवेधी उपस्थित करत येथील समस्यांकडे भागृहाचे लक्ष वेधले होते.
याप्रसंगी लक्षवेधीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील कंत्राटी कर्मचा-र्यांचा प्रश्नही उचलून धरला होता. कंत्राटाराला मुदतवाढ देण्यात न आल्याने येथे अनेक वर्षापासून काम करत असलेल्या जवळपास 336 कामागरांचे 5 महिन्याचे वेतन थकीत असल्याची बाब त्यांनी यावेळी सभागृहाच्या लक्षात आणून दिली होती. आरोग्य सेवेचा महत्वाचा भाग असलेल्या या कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट कोसळल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत कंत्राटदारास मुदतवाढ देत कामगारांचे  थकीत  वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर या मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने ;  पाठपुरावा सुरु होता. सतत हा विषय त्यांनी उचलून धरला होता.
दरम्यान या मागणीची शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असुन सदर सर्व कामगारांचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे असे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अवर सचिव यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त यांना पत्राद्वारे दिले आहे. त्यामुळे आता लवकरच या सर्व कामगारांचे थकीत असलेले पाच महिण्याचे वेतन अदा केल्या जाणार आहे. हा निर्णय होताच आज येथील सर्व कामगारांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी येत त्यांची भेट घेत आभार मानले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनीही कामगार हा आरोग्य सेवेतील प्रमुख घटक आहे. त्यांच्या न्यायासाठी सदैव सोबत राहणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी शेकडो कामगारांची उपस्थिती होती.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here