___________________________
* डॉक्टर आणि पेशंट संबंध सुदृढ करण्यावर दिला भर. *
______________________
* चंद्रपूर.*
_______________________
आय.एम.ए. चंद्रपूरच्या वर्ष 2023-24 च्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आय. एम. ए. हॉल, गंजवार्ड, चंद्रपूर येथे नुकताच संपन्न झाला. डॉ. किर्ती साने अध्यक्ष, डॉ. कल्पना गुलवाडे सचिव, तर डॉ. अपर्णा देवईकर हयांनी कोषाध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
समाजामध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्या संबंधातील दुरावा कमी करण्यासाठी व त्यांचा संबंध सुदृढ करण्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचा मानस डॉ. किर्ती साने व डॉ. कल्पना गुलवाडे यांच्या समूहाने वयक्त केला.
संपूर्ण महिला डॉक्टर्स यांचा समावेश असलेली हि आय.एम.ए चंद्रपूरच्या इतिहासातील पहिलीच कार्यकारणी आहे हे विशेष.
___________________
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अल्का कुथे अध्यक्ष मेडिकोलीगल सेल आय.एम.ए. महाराष्ट्र व डॉ. वर्तिका पाटील मिसेस युनिव्हर्स वेस्ट आशिया हया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यासोबतच आय. एम. ए. चंद्रपूरच्या नविन कार्यकारणीमध्ये अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. नसरीन मावानी, डॉ. प्राजक्ता अस्वार सल्लागार समिती मध्ये यांचा समावेश केला आहे.
______________________________
डॉ. संजय घाटे नियोजित अध्यक्ष तर डॉ. शलाका मामीडवार, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. प्रीती चव्हाण, डॉ. ऋतुता मुंधडा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतील. महिला शाखेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. करुणा रामटेके, डॉ. प्रिया शिंदे उपाध्यक्ष म्हणून आणि सचिव म्हणून डॉ. किरण जानवे हयांनी पदभार सांभाळला.
___________________________
डॉ. वृषाली बोंदगुलवार, डॉ. सोनाली कपूर, डॉ. यामिनी पंत, डॉ. समृध्दी आईंचवार, डॉ. विनिता सिंग दिक्षित, डॉ. समृध्दी वासनिक व डॉ. ऋचा पोडे हया सहसचिव म्हणून कामकाज पाहतील.
_________________________
या कार्यक्रमाच्या उत्कृष्ठ सजावटीसाठी डॉ. पल्लवी अल्लुरवार यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिल्पा मुनगंटीवार, डॉ. नगिना नायडू, डॉ. निखिल टोंगे, डॉ. भूपेश भलमे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी आय. एम. ए. चे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,
____________________________
डॉ. अमोल पोद्दार, डॉ. गोपाल मुधंडा, डॉ. अशोक वासलवार, डॉ. दीपक निलावार, डॉ. राजीव देवईकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुप पालिवाल आणि डॉ. आशिष वरखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. कल्पना गुलवाडे यांनी केले.
___________________________
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
____________________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793