* ग्रामीण भागाच्या विकासासाठी २ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजुर *

0
24

___________________________

* आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न, २४ रस्त्यांचे होणार काॅंक्रिटीकरण *

 _______________________________

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत २ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला असुन सदर निधीतून ग्रामीण भागातील २४ रस्त्यांचे काॅंक्रीटकरण करण्यात येणार आहे.

_________________________________

मतदार संघाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३९ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. यातून ग्रामीण भागाला शहरी भागाशी जोडणारया मार्गाचे काम केल्या जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे.

_____________________________

दरम्यान मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. सदर मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यात आमदार किशोर जोरगेवार यांना यश आले असुन ग्रामीण भागातील विकासकामांसाठी २ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदर निधीतून चिंचाळा, छोटा नागपूर, देवाडा, नकोडा, पांढरकवडा, पिपरी, मारडा, वेंडली, शेणगाव, सिदूर सोनेगाव येथे सिमेंट काॅंक्रिट रस्त्याचे काम केल्या जाणार आहे.

_________________________

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

_________________________

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here