***********************
*पुराेगामी पत्रकार संघाच्या वतीने २ जुन २३ राेजी मान्यवरांचा सन्मान व सत्कार समारोह !*
*************************
* Nilesh Thakre *
************************
चंद्रपुर – पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, दूरदृष्टी, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे धनी मा. श्री विजयजी सुर्यवंशी सर यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सामाजिक, राजकीय, साहित्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान व सत्कार समारोह कार्यक्रमास येत्या शुक्रवार दिनांक २ जून २०२३ रोजी सायं.६.०० वाजता स्थळ :- मृणालगिरी सभागृह, खोबरागडे कॉम्पलेक्स, जयंत टॉकीज चौक, चंद्रपूर संपन्न हाेणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक मा. प्रा. डॉ. इसादास भडके, लेखक, साहित्यिक हे असुन
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य मा.निलेश ठाकरे तसेच प्रमुख अतिथी पुराेगामीपत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष मा.नरेंद्र सोनारकर प्रामुख्याने उपस्थीत राहतील. मा. पवन भगत, लेखक, साहित्यिक, कलावंत
मा. प्रशिक आनंद, रिपब्लिकन चळवळीचे अभ्यासक मा. डॉ. साहस बेंडले, सामाजिक कार्यकर्त
मा. सुरेंद्र रायपुरे, जिल्हाध्यक्ष, भीम आर्मी मा. तनुजा रायपुरे, चंद्रपूर महानगर महिला अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी या सर्व व्यक्तीमहत्वांचे राजकीय, साहित्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन आपला वेगळा ठसा उमटविला या करिता मान्यनरांच्या हस्ते सन्मान व सत्कार हाेणार आहे. तसेत एक ग्रामिण साप्ताहिक संघ हा पुराेगामी पत्रकार संघात आपले विलिकरण करणार असुन या कार्यक्रमाला माेठ्या संंख्येत पत्रकार बंधु आणि भगींनी उपस्थीत राहण्याची
पुरोगामी पत्रकार संघ भारत, चंद्रपूरच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
*************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793