*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सुर्यवंशी यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करा – संतोष जाधव, निलेश ठाकरे*

0
40

**************************

चंद्रपुर :- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे एक रोपटे 2017 साली एका ध्येयवेड्या दूरदृष्टी, प्रेरणादायी व्यक्तीने पनवेल मुंबई येथे लावले होते. त्याच वृक्षाच्या फांद्या आता संपूर्ण भारतभर पसरलेल्या आज दिसत आहेत. त्याच ध्येय वेड्या व्यक्तीच नाव मा.विजयजी सुर्यवंशी सर आहे. येत्या २ जुन २३ रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो. २०१७ पासूनच सातत्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने २ जुन या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवुन संपुर्ण राज्यात पुराेगामी पत्रकार संघाच्या वतीने वृक्षाराेपन करण्यात येते. आज तिच झाडे बरीच मोठी झाली आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष जाधव व महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश ठाकरे यांनी एक ऑलाईन बैठक घेऊन पत्रकार संघातील सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पुढे ते म्हणाले की,
आज राज्यातले तापमान 45 पार गेले आहे. प्रत्येक वर्षी सतत तापमानात वाढ हाेतांना दिसुन येत आहे. त्या करिता वृक्षाराेपनाचे कार्यक्रम राबवीने अत्यंत महत्वाचे असुन संघाच्या मार्फत दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा वृक्षाराेपन कार्यक्रमा करिता पुढाकार घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील पुराेगामी पत्रकार संघाच्या सर्व विभागीय,जिल्हा तथा तालुक्यातिल पद- धिकारी यांना विनंती करण्यात येते की येत्या दिनांक २ जुन २३ राेजी पुराेगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी सर यांचा वाढदिवस आहे. ज्या प्रमाणे मा.विजय सुर्यवंशी सरांनी पुराेगामी पत्रकार संघाचे झाडाचे राेपटे लावुन त्या राेपट्याचे संगाेपन करून त्या राेपट्याला सिमित न ठेवता त्या राेपट्याचे रूपांतर माेठ्या वृक्षात केले. आज पुराेगामी पत्रकार संघाचा हा वृक्ष राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशात आपल्या वृक्षाचा फांद्यांना मजबुत करित देशाच्या चाैथ्या स्तंभाला बळकट करण्यास निरंतर प्रयत्नशिल आहे. या ही वर्षी सुर्यवंशी सर यांचा वाढदिवसा निमित्य पुराेगामी पत्रकार संघाच्या राज्यातिल तमाम पदाधिकार्यांनी आपल्या परिसरात वृक्षराेपनाचा कार्यक्रम राबवुन ५ झाडांचे राेपटे लावुन ३ वर्ष पोटच्या मुलासारखे त्या राेपट्याचे संगोपन करावे. हेच सर्वाच्या वतीने सुर्यवंशी सरांना वाढदिवसा प्रसंगी संघाच्या सभासदांनकडुन अमुल्य भेटवस्तु असेल. असे आव्हान पुराेगामी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्षसंताेष जाधव तथा निलेश ठाकरे यांनी राज्यातिल पुराेगामी पत्रकार संघाच्या सभासदांना केले आहे.

*****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here