***************************
जिवती – तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक जीवन तोगरे रा. पाटागुडा वय चोवीस वर्ष हा युवक गुरुवार पासून बेपत्ता होता.घरच्यांनी तीन दिवसापासून त्याची नातेवाईक व मित्र परिवार कडे शोधाशोध केली मात्र .आज रविवार ला सकाळीच 8 ते 9 वाजता च्या दरम्यान शेनगाव व मरकागोंदी च्या मधील जंगलात एका झाडाखाली नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळला.
जिवन हा समाज सेवेचा पदवीधर होता.त्याने अनेक रक्तदान शिबिरे आयोजित केली होती.कोराना काळात त्याने रात्रंदिवस एक केले होते रुग्णाच्या सेवेला धाऊन जाणारा होता.कधी कुण्या रुग्णाला रक्ताची गरज पडो की कुठली अडचण पडो तो धाऊन जायचा.राजकीय व सामाजिक क्षेत्रात तो जनसामान्यांचा आवाज होता. जीवन हा आईला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन येतो म्हणून सांगून आला होता.मात्र आज त्याचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे चार दिवसापूर्वी एका महिलेने दोघात वाद झाल्याची जीवन तोगरे या मृतकाच्या विरोधात पोलिस स्टेशन जिवती येथे तक्रार केली होती. त्यामुळे आमच्या मुलाची हत्याच आहे याचा तपास व्हावा. अशी मागणी जीवन चे नातेवाईक आणि समाज बांधवांकडून केली आहे.जीवन सोबत त्याचे कागदपत्रे आणि त्याचा बंद मोबाईल टुव्हिल गाडी सापडला आहे. शव विच्छेदन हे घटना ठिकाणी झाले असून त्याचे रिपोर्ट दोन दिवसात पूर्ण होईल असे पोलिस प्रशासनाने सांगितले. घटनेचा अधिक तपास पिटिगुडा उप पोलिस स्टेशन चे ठाणेदार शरद आवारे साहेब आणि त्यांची चमू करीत आहेत.
******************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*******************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793