====================
23 /5 /2023 शुक्रवार रोजी बाल स्नेहा दिवसा चे अवचित्याने शासकीय मुलांचे बालगृह चंद्रपूर येथे बाल न्याय मंडळाचे अध्यक्षा,सरकारी विधीज्ञ मंडळी, सामाजिक कार्यकर्ता स्वयंसेवी संस्था अध्यक्ष श्री शशिकांत मोकाशे, बालगृह निरीक्षक, बालगृहन निरीक्षण गृहातील कर्मचारी वृंद, या सर्वांनी केक कापून बालकांना मिठाई नास्ता वितरित करून हॅपी बर्थडे च्या स्लोगनात अति आनंदाने उत्साहाने स्नेह बाल स्नेह दिवस साजरा केला. त्याप्रसंगी मान्यवरांनी बालकांना विविध बाबींवर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी बालकांना संबोधित करताना पुढील जीवनाचे ध्येय साधून एक उत्कृष्ट सक्षम नागरिक म्हणून समाजापुढे यावे असे प्रतिपादन केले, निरीक्षणगृह अधीक्षक यांनी बालकांना मार्गदर्शन करताना जर समाजात उत्कृष्ट नागरिक म्हणून आपण समोर आला तर आमच्या सर्वांच्या मेहनतीचे खरे पारितोषिक खरे परिश्रम येथे असेल, स्वयंसेवी संस्था अध्यक्ष यांनी त्यांची संस्था व स्वतः बालकांच्या उज्वल भविष्यासाठी सदैव वेगवेगळ्या कौशल्य योजनेतून बालकांचा विकास हे ध्येय घेऊन निरंतर पाठीशी घेऊन उभे असण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन समन्वयक यांनी केले.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793