* एक कोटी रुपयातून विकसीत होत असलेली सावित्री बाई शाळा विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरावी – आ. किशोर जोरगेवार शाळेची पाहणी,*

0
37

**************************

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित शिक्षण वातावरण, प्रभावी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या परस्परसंवादासाठी आदरयुक्त शालेय वातावरण निर्माण करुन प्रत्येक मुलाच्या चांगल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत शिक्षणासह विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास करण्याचे काम शाळेच्या माध्यमातून व्हावे. एक कोटी रुपयातून तयार होणार असलेली ही आर्दश स्मार्ट स्कुल या भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरावी असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
बाबुपेठ येथील सावित्री बाई फुले शाळेच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सदर शाळेचे रुपात्तंर स्मार्ट स्कुलमध्ये होणार आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त विपिन पालिवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, मनपा उपायुक्त अशोक गराटे, शहर मुख्य अभियंता महेश बारई, मनपा सहायक आयुक्त राहुल पंचबुध्दे, सावित्रीबाई शाळेचे मुख्याध्यापक निट, शालेय व्यवस्थापक समिती उपाध्यक्ष राधा चिंचोळकर, शिक्षीका उमा कुकडपवार आदींची प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, बाबुपेठ सारख्या भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेच्या माध्यमातून होत आहे. एकीकडे जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असतांना या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोली कमी पडत आहे. १२०० विद्यार्थ्यांची पटसंख्या असणारी ही कदाचीत एकमात्र शासकीय शाळा असावी. यातून या शाळेतील शिक्षणाचा दर्जा लक्षात येतो. ही शाळा केवळ ईमारत नाही तर गरिब गरजु विद्यार्थ्यांना घडविण्याचे केंद्र आहे. त्यामुळे या शाळेकडे आपले विशेष लक्ष राहिले असल्याचे ते या प्रसंगी म्हणाले.
या शाळेच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरु होते. यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन देता आला याचा नक्कीच आनंद आहे. या निधीतून येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. निधी कमी पडल्यास पुन्हा देऊ, शाळा स्मार्ट होणार हे खरे आहे. पण आता येथील शिक्षकांचीही जबाबदारी वाढणार आहे. आपण उत्तम शिक्षण सेवा देत आहात याची मला खात्री आहे. मात्र आता तुमच्याकडे सर्व सोयी सुविधा असणार आहे. त्यामुळे या शाळेतून निघणा-या विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटावा असे कार्य तुमच्याकडून अपेक्षीत आहे. आज आपण येथे होणार असलेल्या विकासाची पाहणी करणार आहोत. यात आपल्या सुचनांचाही स्विकार असणार असल्याचे ते या प्रसंगी म्हणाले.
यावेळी बोलताना मनपा आयुक्त विपिन पालिवाल म्हणाले कि, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अतुलनीय काम करणारा लोकप्रतिनी आपल्याला मिळाला आहे. २०१९ मध्ये या शाळेच्या विकासासाठी मिळालेला निधी थांबला होता. तो निधी पून्हा मिळवून देण्यात आमदार किशोर जोरगेवार यांनी सहकार्य केले. परिणामी तो ही निधी आपल्याला मिळाला आहे. या निधीतूनही येथे विकास केल्या जाणार आहे. आता शासनाच्या अनेक योजना या शाळेला मिळणार आहे. त्यामुळे निश्चीतच येथील शिक्षणाचा दर्जा उंचावेल अशी आशा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, सायली येरणे, आशा देशमुख, निलिमा वनकर, कविता निखारे, सरोज चांदेकर यांचा सह शिषकवृध्द, पालक वर्ग व स्थानिक नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

**************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here