************************
*आम आदमी पार्टी भद्रावती शहर अध्यक्ष सुरज शहा यांचा आरोप*
***************************
21/07/2023-शुक्रवार
– गोपालचंद साहा यांच्या मालकिची जागा मौजा चिचोर्डी, तालूका भद्रावती या ठिकाणी तीन मजली इमारत आहे. ज्यामध्ये त्यांच्या मालकिचे बार व रेस्टॉरंट आहे. या जागेवर कोणतेही खाली प्लाॅट नसताना भद्रावतीचे तहसीलदार व नायब तहसीलदार व इतर काही अधिकारी यांनी खाली प्लाॅट दाखवून त्याचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला आहे. याची माहिती जागेचे असल मालक गोपालचंद साहा यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा सुरज साहा यांच्या माध्यमातून याची तक्रार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी मा. विनय गौडा साहेब यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून तक्रार नोंदविली आहे व याप्रकरणी ठोस पाऊले उचलून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली व मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा यावर आम्ही चौकशी करुन योग्य ते कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटन मंत्री भीवराज सोनी जी, जिल्हा संघटनमंत्री गंडलेवार जी,
चंद्रपुर महिला अध्यक्षा ऐडवोकेट सुनिता ताई पाटिल, भद्रावती शहर अध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक, बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, महिला सचिव ज्योतीताई बाबरे, सागर कांबळे, तब्बसूम शेख, रोहित जंगमवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
*******************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















