महिला जिल्हा काँग्रेस ची मागणी, रामनगर पोलिसात केली तक्रार दाखल
काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना ट्वीटर वर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी तक्रार जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा नम्रता आचार्य – ठेमस्कर यांनी मंगळवारी (दी. १) रामनगर पोलीस ठाण्यात केली .
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे ( मनोहर कुलकर्णी ) यांनी राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांच्याबद्दल दोन दिवसांआधी आक्षेपार्ह विधान केले. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन झाले. अमरावतीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृवात आंदोलन झाले. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर काल त्यांना ट्विटर वरून अज्ञात इसमाने जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरण गंभीर असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारी आहे.
जर महाराष्ट्रातील माजी महिला मंत्र्यांना अशी धमकी मिळत असेल तर इतर महिला महाराष्ट्रात सुरक्षित आहे का?? हा प्रश्न धरून महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी सहकाऱ्यांसह रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजेश मुळे यांच्या कडे ही तक्रार देण्यात आली. संभाजी भिडें वर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी ही मागणी ठेमस्कर यांनी यावेळी ठाणेदार मुळे यांच्याकडे केली.
या वेळी महिला काँग्रेस च्या उपाध्यक्ष लता बारापात्रे, उपाध्यक्ष मुन्नी मुमताज शेख, जिल्हा महासचिव मीनाक्षी गुजरकर, जिल्हा महासचिव संगीता मित्तल, जिल्हा महासचिव शोभा वाघमारे, जिल्हा सचिव मंगला शिवरकर, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, हर्षा कांबळे यांची उपस्थिती होती.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793