*मनसेच्या निवेदनाची बांधकाम उपविभाग पोंभूर्णानी घेतली तात्काळ दखल*

0
30

 

*त्या अपघातग्रस्त वळणावर सहादिवसात सूचनाफलक लावून केले गतीरोधक निर्माण*

पोंभूर्णा:- तालुक्यातील पोंभूर्णा बल्लारपूर मूख्य मार्गावरील कसरगट्टा गावाजवळ अपघातग्रस्त वळण असून त्या वळणावर अनेक अपघात झाले यात दोन निष्पाप नागरीकांना आपला जीव गमवावा लागले होते असे अपघात वारंवार घडु नयेत यासाठी या धोकादायक वळणावर सूचनाफलक लावून गतीरोधक निर्माण करन्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे, मनविसे तथा मनसे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार, मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगूलवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांच्या प्रमूख मार्गदर्शनात पोंभूर्णा तालुका मनविसे अध्यक्ष आशिष नैताम व मनसे पोंभूर्णा शहराध्यक्ष निखील कन्नाके यांनी दिनांक २५/०७/२०२३ ला निवेदनाद्वारे बांधकाम उपविभाग पोंभूर्णा यांना केली होती सदर मागणी आठ दिवसात पूर्ण करावी असा ईशाराही दिला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा दिवसात सदर मागणी पूर्ण करीत मनसेच्या निवेदनाची तात्काळ दखल घेतली त्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाहिर आभार खूप खूप धन्यवाद असेच आपल्या योग्य सहकार्याची अपेक्षा…. निवेदन देतांना पोंभूर्णा तालुका मनविसे सचिव महेश आर. नैताम, मनसेचे मूल तालूका अध्यक्ष स्नेहल झाडे तथा मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here