चंद्रपूर : महावितरण कंपनीने ठरविलेल्या आकारणीमुळे ग्राहकाकडून एक्स्ट्रा (जास्त) वसूली केल्या जात आहे. त्यामुळे ग्राहकांची महावितरण कंपनी कडून लूट केल्या जात आहे.याबाबतचे निवेदन राकाँचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी महावितरण कंपनी चंद्रपूरच्या अभियंताला नुकतेच निवेदन दिले आहे.
चंद्रपूर शहरातील विज ग्राहकांना एक्स्ट्रा लागून येत असलेला कर कमी करुन फक्त योग्य व वापरात येत असलेल्या यूनिटचेच पैसे विज ग्राहकाकडून घेण्यात यावे. शहरामध्ये, आशियात सर्वात मोठे पावर स्टेशन असून चंद्रपूर वाशियांना मात्र याचा काहीच उपयोग होत नाही. वापरलेल्या यूनिटच्याव्यतिरिक्त कोणताही अगावू आकार महावितरण कंपनीने लावू नये, या पावर स्टेशन मूळे सर्वात जास्त प्रदुषण चा त्रास चंद्रपूर शहर वासीयाना भोगावा लागत आहे. व कर्करोगाचे प्रमाण चंद्रपूर शहरात जास्त प्रमाणात दिसत आहे. व मिटर घेते वेळेस डिंमाड भरल्यानंतरही वर्षानुवर्षे डिंमाड सुध्दा भरावा लागत आहे. या सर्व प्रकरणाची सकोल चौकशी करुन योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राकाँचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी एका निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना माजी नगरसेवक दिपक जयस्वाल, ,ओबीसी सेल जिल्हा शहराध्यक्ष विपिनी झाडे ,मानव अधिकारी सहायत संघाचे सचिव सुहास पिंगे,अक्षय सदैव,सतीश मांडवकर, शुभम ठाकरे,ऋषभ दळणे, भारत धांडे, प्रतिभा खडसे शुभांगी डोईफोडे, कल्पना पडगिलवार, आशिष खडसे, नयन डोईफोडे, गणेश धोटे आदि उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793