राज्यव्यापी जनसंवाद यात्रेचे पोलीस प्रशासनाकडून स्वागत

0
41

—————————————
पोलीस मुख्यालयात अधिकारी व पोलिसांची साधला संवाद
—————————————-
महिला व पुरुष
पोलिसांनी जाणून घेतली माहिती
—————————————-
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा- २०१३अर्थात जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन राज्यव्यापी जनसंवाद यात्रेच्या निमित्याने स्थानिक भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधण्याकरता जनसंवाद यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करताच प्रथमतः भद्रावती पोलीस मुख्यालयात दाखल झाली होती. यात राज्य कार्यकारिणीचे सदस्यांचा सहभाग होता स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांनी महाराष्ट्र अंनिस राज्य कमिटीचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. सदर पोलीस मुख्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३अर्थात जादूटोणा विरोधी कायदा, राज्यातील जनसंवाद यात्रा यासंदर्भातील महत्त्वाची भूमिका जनसंवाद प्रास्ताविकातून सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख व जनमंच सदस्य तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मार्गदर्शक सल्लागार रवींद्र तिराणिक यांनी विशद केली. प्रसंगी पोलीस प्रशासन संवाद कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी कार्यवाहक सदस्य कायदेविषयक प्रमुख मार्गदर्शक नंदिनी जाधव पुणे यांनी पोलीस विभागाशी संवाद साधत सविस्तर मार्गदर्शन केले .
प्रसंगी विषयाच्या अनुषंगाने प्रशासनातील पोलीस अधिकारी व महिला व पुरुष पोलिसांनी संबंधित विषयाच्या अनुषंगाने चर्चा करीत संबंधित विषयाच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत संवाद साधला. प्रसंगी राज्य कमिटीचे सदस्य नंदिनी जाधव राज्य कार्यकारी सदस्य पुणे, भगवान रणदिवे राज्य बुवाबाजी संघर्ष कार्यवाह सातारा, सम्राट हटकर नांदेड, रामभाऊ डोंगरे नागपूर, डॉक्टर राहुल साळवे रवींद्र तिराणिक जनसंवाद प्रमुख प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, विशाल मुळे, राहुल किटे पोलीस अधिकारी, सर्व हेड कॉन्स्टेबल, पोलीस प्रशासनातील सर्व महिला पुरुष विभाग प्रमुख व पोलीस कर्मचारी प्रामुख्याने सहभाग दर्शवून उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने ठाणेदार बिपिन इंगळे यांनी अभिप्राय पत्र याप्रसंगी दिले .सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी महाराष्ट्र जनसंवाद यात्रेला पुढील प्रवासाकरता हिरवी झेंडी दिली.

२०ऑगस्ट २०२३ रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला १०वर्ष पूर्ण होत आहेत. जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्र राज्यात लागू होऊनही १० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने जादूटोणाविरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा २०ऑगस्ट २०२३पासून पुणे येथील म .विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून कायद्याची चित्रमय पोस्टर लावून सजवलेल्या गाडीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. संपूर्ण यात्रा संयोजन व समन्वयक मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार व नंदिनी जाधव पुणे काम पाहत आहेत. पुणे ,अहमदनगर ,औरंगाबाद ,जालना, परभणी ,नांदेड ,यवतमाळ ,असा जनसंवाद मार्गदर्शन व प्रबोधन प्रवास करीत. सदर जनसंवाद यात्रा चंद्रपूर पोहोचली. पुढे गडचिरोली, गोंदिया ,भंडारा ,नागपूर .वर्धा राज्यात पुढे उर्वरित जिल्ह्यात जनसंवाद साधणार आहे.

_________________________

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here