*बाबुपेठ- जुनोना रोडची दैनावस्था*.

0
19

 

बांधकाम विभागाने नव्यानेच सन 2022-23 मध्ये बांधण्यात आलेले बाबुपेठ जुनोना रोडचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येत आहे. गुड मॉर्निंग टीम, बाबुपेठ चे सदस्य नियमित सकाळच्या वेळेस व्यायाम करण्याकरता जंगलात जुनोना रोड ने फिरायला जात असतात. या रोडने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असते त्यामुळे नव्याने बांधलेल्या रोडची दैनावस्था झाली असून रोड फुटल्या अवस्थेत दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात बाबुपेठ ची जनता महिला पुरुष व मुले त्या रोडनी फिरायला जात असतात. त्यारोडवरून येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
नुकताच बांधलेला रोड हा सहा महिन्यांमध्ये अशाप्रकारे फुटणे म्हणजे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते.
बांधकाम विभागांनी संबंधित ठेकेदाराला पकडून या रोडची ताबडतोब दुरुस्ती करावी अशी गुड मॉर्निंग ग्रुप कडून व त्या रोडवरून फिरणाऱ्या नागरिकां कडून सारखी मागणी होत आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here