*चंद्रपुरात मुख्य रसत्यावर शुभेच्छा बैनर बिना परवानगी लावण्यावर अंकुश लावने गरजेचे*

0
58

=====================

*निलेश ठाकरे*  9371321070

========≈=≈========

चंद्रपुर – चंद्रपुरच्या मुख्य रसत्यावर शुभेच्छा बैनर माेठ्या प्रमाणात नेहमिच लागत असतात. त्यामुळे चंद्रपुर शहरातील मुख्य रसत्याचे विद्रुपिकरण हाेत आहे. मात्र हे बैनर लावत असतांना चंद्रपुर महानगरपालिकेच्या वतीने परवानगी काढण्यास सांगण्यात येते. परवानगी नसल्यास लावलेल्या बैनरला मनपा कर्मचारी आयुक्त, सह-आयुक्त, अतिक्रमान अधिकारी, यांच्या आदेशाने तात्काळ बैनर काढण्यास सज्ज असतात. परंतु हेच बैनर राजकिय पक्षा अंतर्गत लागल्यास त्यांना मात्र बिना परवानगी दहा पंधरा दिवसा पेक्षा जास्त दिवसाकरिता मुभा देण्यात येत असते. महापालिकेच्या अतिक्रमान विभाग व वरिष्ठ अधिकारी यांचे नेत्यांवर असलेल अती उत्साहीत प्रेम आपुलकी यावर आता अंकुश लावने फार गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने सध्या तरी बैनर लावण्याकरिता काही नियम, अटी, शर्ती ठरवण्यात आले आहे. यात शुभेच्छा बैनर लावायचे असल्यास महापालिकेतुन ३ दिवसाकरिता ३ रूपये प्रती स्के.फुट ६×८ च्या बैनरची रितसर परवानगी घ्यावी लागते. ते ही मुख्य रसत्यावरिल काही ठराविक स्थळावरच बैनर लावता येत असतात. मात्र या सर्व बाबीकडे राजकिय नेते व त्यांचे समर्थक बैनर लावतांना महापालिकेच्या नियमाची सर्रास पणे पायमपल्ली करत असतात. अनेक राजकिय नेत्यांचे तसेच समर्थकांचे बैनर लावतांना चंद्रपुर मनपाकडुन परवानगी घेतच नसल्याचे मनपा कार्यालयातुन स्पष्ट झाले आहे. मात्र या राजकिय नेत्यांचे फाेटाे असलले बैनर तीन दिवस तर साेडा दहा पंधरा दिवस हाेवुन सुध्दा चंद्रपुर शहराच्या मुख्य रसत्यावर लागलेले दिसुन येतात. या मुळे चंद्रपुर शहरातिल मुख्य रसत्याचे विद्रुपिकरण माेठ्या प्रमाणात हाेत आहे. यांना जशी मुभा मनपा देत असेल तर मग ईतरांना का नाही असा प्रश्न ईतर सामाजिक संघटनेच्या वतीने केला जात आहे. महापालिकेचे नियम हे सर्वासांठी सारखे असायला हवेत. चंद्रपुर महापालिकेतिल मागील सत्ताधारी यांनी तर बैनर लावण्याचा तर उद्दामच माजवला दिसुन येताे. असे असुन ही चंद्रपुर येथिल महापालिकचे आयुक्त, सह – आयुक्त, अतीक्रमण अधिकारी यांच्यावर कुठलिच कारवाही करतांना दिसुन येत नाही. सध्या महापालिकेत प्रशासक कारभार सुरू असुन ही आत्ताच्या स्थितीत राजकिय कारभार सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसुन येत आहे. महापालिकेत मागील मनपाच्या सत्ताधार्यांना तर मिळेल त्या ठीकानी बिना परवानगी बैनर लावयची मुभा मनपा अधिकारी यांनी यांना कायमचीच दीली आहे काय ? अशी चर्चा आता जनतेत राेजच हाेत असते. मात्र मुख्य रस्यावर जर का सामान्य मानसांनी किवा सामाजिक संघटने तर्फे चंद्रपुर शहरातिल गांधी मार्ग, कस्तुरा मार्ग, ताडेबा राेड तुकुम, बंगाली कँम्प, नागपुर राेडवर माेठ्या संख्येत रसत्याच्या बाजुला शहरात मिळेल तीथे बैनर लावले तर लगेच विलंब न करता त्यांच्यावर कारवाही करून बैनर काढण्यात येते. चंद्रपुर मनपा अतिक्रमाण विभाग हा राजकिय नेत्यावर किंवा त्यांच्या समर्थकांवर कारवाही करण्यास दुर्लक्ष करित सामान्य लाेकांनवर कारवाही करण्यास वेगवान, पध्दतीने कारवाही करण्यास सज्ज असताे. जयंती, उत्सवाच्या वेळस सामान्य लाेकांनी लावलेले बैनर अनुमती घेतली नसल्यास याचे कारण सांगुन त्याचे बैनर तात्काळ काढण्याचे आदेश मनपा आयुक्त, सह – आयुक्त यांच्या मार्फत अतीक्रमाण अधिकारी आपल्या कर्माचार्यांना देत असतात. बिना परवानगी राजकिय पक्षाच्या बैनरवर कुठलिच कारवाही मात्र हाेत नाही. त्यांना सर्रासपणे बैनर लावु दील्या जाते. असे दाेन ताेंडी मालवनी सापाचे धाेरण चंद्रपुर महानगरपालिकेचे मनपा आयुक्त,अतिक्रमाण विभागा कुडुन चंद्रपुर महापालिकेकडुन राबवीले जात आहे. नेहमिच शहरात अनेक राजकिय नेत्यांचे परवानगी नसणारे शुभेच्छा बैनर अनेक दिवसापासुन शहरात लागुन असतात. ही वस्तुस्थिती असुन चंद्रपुरकर दुचाकी, चारचाकी वाहन धारक मात्र या बैनर, पाेस्टर मुळे वाहन चालवतांना त्रस्त दिसुन येताे. त्यात मुख्य रसत्यावर अनेक व्यापार्यांचे प्रतीष्ठान आहे. त्यांना ही यांच्या प्रतीष्ठानापुढे बैनर लागल्या त्रास हाेत असल्याचे म्हनने आहे. चंद्रपुर मनपा अतिक्रमाण वाहणाची गाडी कारवाही करण्यास गेली असता, अतिक्रमाण अधिकारी साेबत असायला हवे परंतु अधिकारी अनेकदा साेबत राहत नाही. अधिकारी साेबत नसल्याने मनपा कर्मचार्यांना जनतेचे बाेलने ऐकुन घ्यावे लागते. त्यामुळे परवानगी असलेले बैनरच चंद्रपुरातील मुख्य रसत्यावर लागायला हवे. मग ते राजकारणी नेत्यांचे असाे किंवा सामाजिक संघटनेचे असाे कुठलेच बैनर मनपाच्या बिना परवानगी कुनाला ही मनपाने लावु देवु नये. अशी मागनी चंद्रपुरच्या जनतेकडुन केल्या जात आहे.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here