आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन मागे

0
23

====================

रुग्णालयात डाॅक्टरांना मिळणार पोलिस सुरक्षाअधिका-यांसह आ. जोरगेवार यांची बैठक  

====================

रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांनी डॉक्टराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिकाऊ डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेत त्यांना रुग्णालयात अधिक पोलिस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. तर वेतन अदा न झाल्याने डॉक्टरांच्या दुस-या संघटनेने सुरु केलेले आंदोलन सुरुच आहे. याबाबतही वरिष्ट पातळीवर चर्चा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

=======≈=============

काल बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आंदोलनकरत असलेल्या डॉक्टरांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. नंतर लगेच त्यांनी रुग्णालय आणि पोलिस प्रशासन यांच्या अधिका-यांची बैठक घेत डॉक्टरांना सुरक्षा देण्याच्या सूचना केल्यात. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उप वैद्यकीय अधिक्षक भुषण नैताम, प्रा. डॉ मिलींद कांबळे, प्रा. डॉ प्रशांत उईक, शहर पोलिस ठाण्याचे पालिस निरिक्षक राजपूत आदींची उपस्थिती होती.

=====================

जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टराला रुग्णांच्या नातलगांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी कार्यवाही केली आहे. मात्र या घटणेच्या विरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात आंदोलन सुरु केले होते. याचा परिणाम आरोग्य सेवेवर दिसुन आला होता. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाउन डॉक्टरांशी चर्चा केली. येथे पुर्ण वेळ सहाय्य पोलिस दर्जाचा अधिकारी तैणात ठेवण्यात यावा, ओपीडी मध्ये दोन पोलिसांची तैनाती ठेवण्यात यावी डॉक्टरांना सुरक्षा देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला केल्या आहे. तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा करत त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनतर डाॅक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.

===========≈=========

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here