*राशन कार्डच्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांचे मौन आम्ही खपवून घेणार नाही:-*

0
33

=======================

आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर उपाध्यक्ष सय्यद अफजल अली*

========================
राशन कार्ड व त्यावर मिळणारे रेशन हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा आधार आहे, त्याचा लाभ सर्वांना मिळायला हवा, मात्र बल्लारपूर शहराचे तहसील कार्यालयाचे अधिकारी त्याची दखल घेत नसल्यामुळे बल्लारपूर शहरातील अनेक लोक मागील ३ वर्षापासून अडचणीत आहेत, २०१९ मध्ये बनवलेल्या नवीन राशन कार्ड वर आजपर्यन्त रेशन सुरु झाले नाही आणि एका कुटुंबात ५ सदस्य असतील तर ३ किंवा २ चे अंगूठे चालत नाही, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ६-६ महिने लागतात पण काम होत नाही अशा परिस्थितीत लोक रेशनकार्ड विभागाच्या खोली क्र. 2 वर गेले असता, गेल्या आठवडाभरापासून तेथे एकही संगणक ऑपरेटर उपस्थित नाही, असे विचारले असता कोणीही उत्तर देत नाही.. हीच परिस्थिती पाहून आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष अफजल अली यांनी तहसील कार्यालय गाठले असता, ते राशन कार्ड विभागात गेले असता एकही अधिकारी उपस्थित नसताना तहसीलदार मॅडम यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
1) 2019 मध्ये राशन कार्ड वर रेशन कधी सुरू होणार? 2) संगणक ऑपरेटर कधी येणार? 3) रेशनचा प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांना कोण उत्तर देणार? 4) अचानक बंद पडलेली कार्डे पुन्हा कोण सुरू करणार? या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास किंवा प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास लवकरच तहसील कार्यालयाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि त्याला जबाबदार संमधित अधिकारी असतील, असा इशाराही अफजल अली यांनी दिला आहे.

==========≈===========

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here