आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहली क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांना आदरांजली

0
19

=====================

क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांच्या पूण्यतिथी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा कारागृह परिसरातील शहीद स्मारक येथे जात क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांना आंदराजली अर्पण केली. यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, वैशाली मेश्राम, नितेश गवळे, हनीफ शेख, शेखर मेश्राम, प्रवीण पंचबुधे, सूरज गावडे, गणेश ईसंनकर, संदीप जाधव, दीपक वांधारे, बाळू कुळमेथे,रणजित मडावी ,कमलेश आत्राम, सोमेश राजगडकर, सोनू चांदेकर, लता पोरटे आदींची उपस्थिती होती.

======================

आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांनी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला पूढे हाच लढा चंद्रपूरच्या स्वातंत्रलढ्यात परिर्वतीत झाला. चंद्रपूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर शहिद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विशेष महत्वाचे असल्याची भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.  शहिद बाबूराव शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा कारागृहातील शहिद स्मारकास आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांच्या नावाचा जयघोष केला.

=====≈================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here