कॉंग्रेस, शिवसेना (उबाठा)आणि राष्‍ट्रवादी (शरद पवार गट)कंत्राटी पदभरत्‍यांची जननी

0
32

=======================

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर द्वारे भव्य निदर्शने 

=======================
भारतीय जनता पार्टी सत्‍तेसाठी नव्‍हे तर युवकांच्‍या कल्‍याणाकरिता कार्य करते – राहूल पावडे
=======================
कंत्राटी पदभरती करुन युवकांच्‍या मनात असंतोष निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. मात्र या भरतीला सुरुवात कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीनेच केली होती. २००३ साली कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीचे सरकार असताना शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्‍यात आली. त्‍यानंतर २०१० साली अशोक चव्‍हाण मुख्‍यमंत्री असतांना दोनदा कंत्राटी भरती काढण्‍यात आली. २०११ साली पृथ्‍वीराज चव्‍हाण मुख्‍यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जिआर काढण्‍यात आला. २०१३ साली ही अशीच भरती काढण्‍यात आली. उध्‍दव ठाकरे हे मुख्‍यमंत्री असताना शरद पवार यांच्‍या आशिर्वादाने त्‍यांनीही कंत्राटी पदभरतीची निविदा काढली होती. मात्र हे लोक स्‍वतःच पाप आम्‍हच्‍या माती फोडण्‍याचा प्रयत्‍न करत होते. त्‍यामुळे आता आम्‍ही अशी भरती करण्‍याचा निर्णय घेत आहोत, असे राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. कॉंग्रेस- शरद पवार यांची राष्‍ट्रवादीच कंत्राटी पदभरतीची जननी आहे. त्‍यामुळे शिवसेना (उबाठा) -कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या (शरद पवार गट) विरोधात गांधी चौक चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टी द्वारे तिव्र निदर्शने देण्‍यात आली.
======÷===============
दि. २१.१०.२०२३ रोजी चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी द्वारे कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी  पार्टीने राज्‍यामध्‍ये दीर्घ काळापासून  कंत्राटी पध्‍दतीने विविध भागांमध्‍ये पदभरती केली. या विरोधात तिव्र निदर्शने देण्‍यात आली. यावेळी भाजपा महानगर चंद्रपूर अध्‍यक्ष राहूल पावडे म्‍हणाले, राज्‍यातील तरुणांच्‍या भविष्‍याचा विचार करुन कंत्राटी पदभरती पध्‍दत राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी रद्द केला. भारतीय जनता पार्टीचा उद्देश सत्‍ता नसुन जनतेचे कल्‍याण आहे. युवकांची प्रगती आहे. त्‍यामुळे त्‍यांनी हा स्‍तुत्‍य निर्णय घेतला. यावेळी भारती जनता पार्टीचे राहुल पावडे, मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, राजू गोलीवार,रविंद्र गुरणुले,अजय सरकार,प्रदीप किरमे,अरुण तिखे, सविता कांबळे,शीला चव्हाण, माया उईके,पुष्पा उराडे,वनिता डुकरे,ज्योती गेडामदिनकर सोमलकर, विठल डुकरे,संदीप आगलावे,सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर,,प्रभा गुडधे,वंदना संतोषवरसिंधू राजगुरे,सुनीता जयस्वाल, मनीषा महातव,राजेंद्र खांडेकर, प्रज्वलन कडू,  चांद सय्यद,सुनील डोंगरे, सत्यम गाणार,  शकील शेख, जाहीर खान,  प्रलय सरकार, मनोज पोतराजे,महेश झिटे,रवींद्र चहारे, राजू जोशी, हेमराज कळमकर, प्रवीण पोशेट्टीवर, प्रदीप मोगरे,  गणेश रामगुंडावार, रमेश बीश्वास,निलेश बेडेकर, केतन मेहता,  बाळू कोलनकर, विजय आगरे, चंदन पाल, पराग पिंपळकर, अमोल नगराळे, गोपाला जोशी, हर्षल येरावार, अनिकेत आगलावे,  राजेश यादव, कुंदन सिंग, गुड्डू यादव, खुशाल साखरकर, सुभाश आदमाने, श्याम बोबडे, राहुल नकुलवार, रामकुमार अकापल्लीवार,  भानेश मातंगी, विनोद शेरकी, , विनोद नवले, मधुकर राऊत, बबन राऊत, शुभम मंथनवार, प्रवीण ऊराडे, विष्णू वरभे
=========================
पियुष भोगेकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here