========================
जिल्हाधिकारी चंद्रपूर
==≠=====≠=============
महोदय सविनय विनंती याप्रमाणे आहे की,
आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम समाजालाही ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. पण आता मराठा आरक्षणाची चर्चा आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिमांनाही आरक्षण मिळायला हवे. कारण सच्चर समितीसह अनेक समित्यांनी मुस्लिमांच्या गरीब स्थितीचा दाखला देत मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली असली तरी स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांचे नेते मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प आहेत. यातून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या सरकारनं मुस्लिम समाजाचे आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक स्थिती बघता सबका साथ सबका विकास या घोषणेला परिपूर्ण करावे आणि मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचे शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय कमकुवत लक्षात घेऊन मुस्लिम समाजाला त्यांच्या हक्काचे पाच टक्के आरक्षण जाहीर करावं आणि मुस्लिम समाजा सोबत न्याय करावा अशी मागणी आम्ही मुस्लिम ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून करीत आहोत जर भविष्यामध्ये मुस्लिम समाजाचे आरक्षण दिलं नाही तर मुस्लिम समाजामध्ये निराशा निर्माण होऊ शकतात म्हणून सरकारने महमदुर रहमान कमिटी सच्चर कमिटी या सर्व कमिट्यांच्या शिफारशींना लक्षात घेता मुस्लिम समाजाला न्याय करावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना करीत आहोत.
दिनांक 05 Nov 2023
ठिकाण :चंद्रपूर
आपला विश्वासू
मोहम्मद इरफान शेख
===============≠
कार्याध्यक्ष अध्यक्ष
मुस्लिम ॲक्शन कमिटी चंद्रपूर
==================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=============≠===
संपादक :- शशी ठक्कर 9881277793