*पत्रकारांनी निस्पृह व निर्भीडपणे लिखाण केले पाहिजे*

0
31

=======≠===========

*रवींद्र तिराणिक*
==================
मनात कुणाविषयी द्वेष, मत्सर, आकस, ममभाव न बाळगता पत्रकारांनी लोकहित जोपासत जनकल्याणार्थ पारदर्शकपणे ,निस्पृह व निर्भीड पणे लिखाण केले पाहिजे. लोकशाही हा केंद्रबिंदू लक्षात घेता पत्रकारांनी आर्थिक विवंचनेत जाऊन राजकीय मानसिकतेच्या गुलामगिरीत पत्रकारिता करू नये. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जनहितार्थ कल्याणसाठी लढणारा पत्रकार ही प्रचलित आख्याकिका अनेक विचारवंत ,लेखक व मातबर संपादक ,पत्रकारांनी अनेक दशकापासून जोपासत ठेवली आहे . ती सध्याच्या परिस्थितीत अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कालांतराने काही दशकापासून ‘कालची -आजची- उद्याची ‘पत्रकारितेमध्ये बदल होताना दिसते आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने विचार मंथन करणारी बाब असून, घातक प्रवृत्तीचे लक्षण आहे. पत्रकारांच्या लेखणीमध्ये ग्राम, गाव शहर जिल्हा राज्य व देश यामध्ये आमुलाग्र बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु पत्रकारांच्या लेखणीने राजकीय गुलामगिरीत राहून आपली शाही संपू न देता योग्य दिशेने वाटचाल करीत जनकल्याणार्थ प्रश्नांना प्राधान्य रूप द्यावे तरच लोकशाही शाबूत राहील व जनसामान्यांचे प्रश्न सोडवता येतील असे स्पष्ट व प्रखर मत सामाजिक कार्यकर्ते व जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक यांनी मांडले .आनंदवन येतील सामाजिक मंच व पत्रकार संघाच्या ओळखपत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते.
“हात लगे निर्माण में, नही मांगणे नही मारणे” जगप्रसिद्ध समाजसेवक श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या आनंदवन येथील कर्मभूमीत समाधी स्थळाला वंदन करीत नमन होत बाबा आमटे व साधनाताई सोबत घालवलेल्या जुन्या दिवसांची आठवणींना उजाळा देत सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते जनमंच सदस्य ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख, महाराष्ट्र अंनिस मार्गदर्शक सल्लागार, कला अकादमीचे संचालक रवींद्र तिराणिक यांनी सामाजिक कार्याच्या चळवळीची जाणीव खऱ्या अर्थाने आनंदवनातून करून दिली . प्रसंगी ग्रामीण विभागातून खडतर पत्रकारिता करीत असताना ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजय प्राप्त झालेले जगदीश पेंदाम यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. (सामाजिक क्षेत्र व पत्रकारिता ओळख पत्र) अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने प्रदीप कोहपरे, सादिक थैम, प्रशांत बदकी, परमानंद तिराणिक, ग्यानीवंत गेडाम, तुलसीदास अलाम, जगदीश पेंदाम, धर्मेंद्र शेरकुरे, मनोज गाठले, विनोद शर्मा, समीर आसुटकर ,माधव जीवतोडे उपस्थित आदींना सन्मान करीत ओळखपत्र वितरण करण्यात आले.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here