मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या शुभहस्‍ते सार्वजनिक व घरगुती गणेशोत्‍सव स्‍पर्धा २०२३ चे भव्‍य बक्षिस वितरण

0
47

=========================

राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रेरणेने आयोजित सार्वजनिक व घरगुती गणेशोत्‍सव स्‍पर्धा २०२३ चे भव्‍य बक्षिस वितरण तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या रक्‍तदान शिबिराच्‍या आयोजक पदाधिका-यांचा सत्‍कार यावेळी करण्‍यात येणार आहे.  तसेच मुंबईच्‍या कलावंतांचा सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
==========================
दि. २७ नोव्‍हेंबर २०२३ रोजी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर द्वारे गांधी चौक, महानगरपालिका पार्कींग येथे सायं. ०६ वा.  सार्वजनिक व घरगुती गणेशोत्‍सव स्‍पर्धा २०२३ चे भव्‍य बक्षिस वितरण करण्‍यात येणार आहे. चंद्रपूर शहरामध्‍ये सार्वजनिक गणेशोत्‍सव स्‍पर्धा घेण्‍यात आली. या स्‍पर्धेमध्‍ये ५१ हजार ०१ रुपयाचे प्रथम पारितोषिक सार्वजनिक नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्‍तनगर चंद्रपूर, ३१ हजार ०१ रुपयाचे द्वितीय पारितोषिक सार्वजनिक न्‍यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड, चंद्रपूर, २१ हजार ०१ रुपयाचे तृतिय पारितोषिक सार्वजनिक सार्वजनिक गणेश मंडळ, सिव्‍हील लाईन, चंद्रपूर यांना जाहीर करण्‍यात आला आहे.  तसेच घरगुती गणेशोत्‍सव स्‍पर्धेमध्‍ये प्रथम पारितोषिक घरगुती श्री.  गणेश रविंद्रराव गिरीधर, बापट नगर, चंद्रपूर, द्वितीय पारितोषिक घरगुती श्री. शेषराव गहुकर, गोपालपुरी चंद्रपूर, तृतिय पारितोषिक घरगुती श्री. अशोक किसनराव नेवारे, घुटकाळा वार्ड, चंद्रपूर यांना जाहीर झाला आहे.  त्‍यांना भेट वस्‍तू देऊन सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
============================
सार्वजनिक गणेशोत्‍सव स्‍पर्धेमध्‍ये बल्‍लारपूर शहरातील ३१ हजार ०१ रुपयाचे प्रथम पारितोषिक सार्वजनिक न्‍यु संमित्र क्रीडा गणेश मंडळ, गांधी वार्ड, बल्‍लारपूर, २१ हजार ०१  रुपयाचे द्वितीय पारितोषिक सार्वजनिक श्री बाल गणेश मंडळ, महाराणा प्रताप वार्ड, बल्‍लारपूर, ११ हजार ०१ रुपयाचे तृतिय पारितोषिक सार्वजनिक श्री किल्‍ला वार्ड हनुमान बहुउद्देशिय संस्‍था व व्‍यायाम शाळा, किल्‍ला वार्ड, बल्‍लारपूर  यांना जाहीर झाला आहे. घरगुती गणेशोत्‍सव स्‍पर्धेमध्‍ये प्रथम पारितोषिक श्रीमती सोनाली मंगेश गोहणे, गांधी चौक, गांधी वार्ड, बल्‍लारपूर, द्वितीय पारितोषिक श्री. साहील नरेश दासरवार, शिवाजी वार्ड, बल्‍लारपूर, तृतिय पारितोषिक श्री. किशोर नानाजी मोहुर्ले, महाराणा प्रताप वार्ड, बल्‍लारपूर यांना जाहीर झाला आहे.  त्‍यांना भेट वस्‍तू देऊन सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
=============================
सार्वजनिक गणेशोत्‍सव स्‍पर्धेमध्‍ये मुल शहरातील ३१ हजार ०१ रुपयाचे प्रथम पारितोषिक सार्वजनिक गणेश मंडळ मुल, २१ हजार ०१  रुपयाचे द्वितीय पारितोषिक सार्वजनिक नेताजी गणेश मंडळ मुल, ११ हजार ०१ रुपयाचे तृतिय पारितोषिक सार्वजनिक सन्‍मीत्र गणेश मंडळ मुल  यांना जाहीर झाला आहे. घरगुती गणेशोत्‍सव स्‍पर्धेमध्‍ये प्रथम पारितोषिक श्री. अशोक आक्‍केवार मुल, द्वितीय पारितोषिक सौ. नयना जैन मुल, तृतिय पारितोषिक श्री. वसंत भगत मुल यांना जाहीर झाला आहे.  त्‍यांना भेट वस्‍तू देऊन सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
=============================
यावेळी चंद्रपूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना ५००१ रुपयांचे १० प्रोत्‍साहनपर पारितोषिक, ३ घरगुती गणेशोत्‍सव प्रोत्‍साहन पारितोषिक तसेच बल्‍लारपूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना ५००१ रुपयांचे १० प्रोत्‍साहनपर पारितोषिक, १० घरगुती गणेशोत्‍सव प्रोत्‍साहन पारितोषिक देण्‍यात येतील. मुल शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना ५००१ रुपयांचे ०५ पारितोषित, घरगुती गणेशोत्‍सव प्रोत्‍साहन ०५ पारितोषिक देण्‍यात येतील.
=========================
मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त भव्‍य रक्‍तदान शिबिर २४ ठिकाणी आयोजित करण्‍यात आले होते. यामध्‍ये ३४७३ रक्‍तपिशव्‍यांचे संकलन करण्‍यात आले होते. या शिबिराचे यशस्‍वी आयोजन केल्‍याबद्दल आयोजक पदाधिका-यांचा यावेळी सत्‍कार करण्‍यात येणार आहे.
=========================
यावेळी स्‍व.डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्‍या जयंती पित्‍यर्थ भजन स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यामधील १५ भजन मंडळांना सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
=============================
या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्‍ये वंदेभारत नृत्‍योत्‍सवाचे विजेते  व २५ हून अधिक देशांमध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व केलेले बी.बी. परफॉर्मिंग आर्टस्, मुंबई सादर करणार आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतून तयार झालेल्‍या महिमा महाराष्‍ट्राचा, एकमेव महाराष्‍ट्र, गणराज रंगी नाचतो व उत्‍सव महाराष्‍ट्राचा हा कार्यक्रम पारितोषिक वितरणाची शोभा वाढविणारा ठरणार आहे.
=======================
भारतीय जनता पार्टी महानगर जिल्‍हा चंद्रपूर द्वारे या पारितोषिक वितरण सोहळयामध्‍ये उपस्थित राहण्‍याची विनंती करण्‍यात आली आहे.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.

=========≈===================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here