Home
Home चंद्रपूर श्री महर्षी सुदर्शन महाराज जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने...

श्री महर्षी सुदर्शन महाराज जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

0
108

===========================

श्री महर्षी सुदर्शन महाराज जी यांच्या जयंतीनिमित्त सुदर्शन समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शोभायात्रेचे गंजवार्ड चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, यूवा नेते अमोल शेंडे, अंकुश आमटे, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, राज हजारे, इमरान शेख, नितेश गवळी, करणसिंह बैस, राहूल खाडे आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही सुदर्शन समाजाच्या वतीने श्री महर्षी सुदर्शन महाराज जंयती निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दादमहल वार्ड  येथील श्री सुदर्शन महाराज मंदिर येथुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत. जटपूरा गेटला वळसा घालुन कुस्तुरबा मार्गे पुन्हा सुदर्शन महाराज मंदिर येथे पोहचली. यावेळी गंजवार्ड येथे या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच तयार करण्यात आला होता. सदर शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत करत श्री महर्षी सुदर्शन महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या शोभायात्रेत शेकडो समाज बांधव उपस्थित झाले होते.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here