*ऑटोरिक्षा चालक मालक महासंघाच्‍या मागण्‍यांची पुर्तता करण्‍याकरिता मुख्‍यमंत्र्यांशी बैठक घेऊ – सुधीर मुनगंटीवार*

0
48

=========================

ऑटोरिक्षा चालक मालकांचा विधानभवनासमोर मागण्‍यांकरिता धरणा  
===========================
महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संयुक्‍त महासंघा तर्फे
==========================
राज्‍याची उपराजधानी नागपूर येथे सुरु असलेल्‍या हिवाळी अधिवेशनामध्‍ये विदर्भातील अनेक समस्‍या सोडविण्‍याकरिता विविध संघटना धरणे, मोर्चा या माध्‍यमातून मागणी करीत असतात. त्‍यामुळेच महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक महासंघातर्फे त्‍यांच्‍या अनेक प्र‍लंबित मागण्‍यांकरिता विधिमंडळासमोर धरणे देण्‍यात आले.
=========================
दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील विधिमंडळासमोर महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संयुक्‍त महासंघातर्फे त्‍यांच्‍या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्‍यांकरिता धरणे देण्‍यात आले. घोषित झालेले ऑटोरिक्षा चालक मालक कल्‍याणकारी मंडळाची त्‍वरित अंमलबजावणी, ऑटोरिक्षा खुले मुक्‍त पर‍मिट वाटप बंद करण्‍यात यावे, वाहतूक पोलिस मार्फत होणारी फोटो शुट, ई-चालान पध्‍दत बंद करण्‍यात यावी, ऑटोरिक्षा चालकांचे स्‍वतंत्र मतदान संघ निर्माण करण्‍यात यावा इ. मागण्‍यांकरिता त्‍यांनी धरणे दिले.
=========================
यावेळी ऑटोरिक्षा चालक मालक महासंघाच्‍या धरण्‍याला राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय तथा चंद्रपूर – वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन राज्‍यातील ऑटोरिक्षा चालक मालक यांच्‍या मागण्‍यांची पुर्तता करण्‍याकरिता येत्‍या ८ ते १० दिवसात मुंबई येथे मुख्‍यमंत्र्यांशी बैठक घेण्‍यात येईल असे आश्‍वासन त्‍यांनी दिले. यावेळी प्रामुख्‍याने महारष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक  मालक महासंघाचे राज्‍यस्‍तरीय अध्‍यक्ष महेश चांगुले, कार्याध्‍यक्ष चरणदास वानखेडे, महा‍सचिव मच्छिंद्र कांबळे, संघटक राजेंद्र खांडेकर, आनंद चवरे, नियात सय्यद, मधुकर राऊत, सुनिल धंदरे, विनोद चन्‍ने, कुंदन रायपुरे, दिलीप ढवळे, परशुराम तुराडे, अंकुश  कौराते, किशोर वाटेकर, वासुदेव कुबडे, महेश ढेकरे, जनार्धन गुंजेकर, अरविंद चौरे, राकेश पवार, बबन टोंगे, अविनाश उकेकर, रमेश वझे, बंडू भगत व राज्‍यातील असंख्‍य ऑटोरिक्षा चालक मालक  यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here