*भाजप महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अहेतेशाम अली*

0
30

====================== 

    *वरोरा* 

=======================

वरोरा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी नियुक्त्यांचा धडका लावला आहे. जिल्हा, ग्रामीण अध्यक्षांसह कार्यकारणीची निवड प्रक्रिया रखडली असली तरी राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत. (Bjp News) भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अहेतेशाम अली यांची निवड करण्यात आली आहे.

====================

वरोरा नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा सचिव अहेतेशाम अली यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी मुंबई येथे झालेल्या (Bjp) भाजपाच्या बैठकीनंतर नियुक्ती केली. अहेतेशाम अली हे गेल्या 9 वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 2016 मध्ये नगरपालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष सह नगरसेवक निवडून आणले होते.
वरोरा नगरपालिकेवर भाजप सत्ता स्थापन यश मिळवलेले होते.

======================

अहेतेशाम अली यांचा कार्यकाळामध्ये वरोरा शहराचा सर्वाधिक विकास झाला. शहरातील सर्व मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले.
शहरात हायमास्ट लाईट आणि डेकोरेटिव्ह पोल बसविण्यात आले.
मानवी जीवन निरोगी रहावे म्हणून काही वार्डात वाटर एटीएम बसविण्यात आले.
वरोरा नगरपरिषदे ला स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळाले होते.

=========================

अहेतेशाम अली यांच्या वर पक्षाने आता त्यांना बढती देत त्यांच्यावर अल्पसंख्याक आघाडीच्या उपाध्यक्ष पदाची ची जबाबदारी सोपवली आहे. (Maharashtra) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया अहेतेशाम अली यांनी दिली.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here