*वैज्ञानिक दृष्टीकोण असलेली पिढी घडविण्यासाठी विज्ञाण प्रदर्शनी गरजेची*

0
43

=======================

     *विशाल निंबाळकर* 

======================

*शांती निकेतन स्कुलच्या वतीने विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन*
======================

आजचा युवक प्रतिभावंत आहे. अनेक क्षेत्रात त्याने आपले आणि पर्यायाने आपल्या जिल्हाचे नावलौकिक केला आहे. मात्र विज्ञान क्षेत्राकडे सध्यातील अपेक्षीत असा विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसत नाही. त्यामुळे शालेय जीवनातच त्यांच्यात विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यातुन वैज्ञानिक दृष्टीकोण असलेली पिढी घडावी, यासाठी विज्ञान प्रदर्शनीचे नियमित आयोजन गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी केले.
विठ्ठल मंदिर वार्ड येथे शांती निकेतन स्कुलच्या वतीने विज्ञान प्रदर्शनी आणि हाताने बनवलेल्या खाद्य पदार्थांच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ. संगीता ताई खांडेकर, विठ्ठल व्यायाम शाळेचे पदाधिकारी अशोक जी अंबिरवार, भाजयूमो उपाध्यक्ष राहुल पाल, शांती निकेतन स्कूलचे प्रिन्सिपल पांडे मॅडम, बुरुडकर मॅडम ,पांडे सर,सौ नंदाताई शेरकी मॅडम, शांतिनिकेतन स्कूलचे संपूर्ण टीचर स्टॉप आदींची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना विशाल निंबाळकर म्हणाले की, शालेय जीवन हे मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ आहे. मात्र या वयात विद्यार्थी घडत असतो. त्याच्यातील कलागुणांचा शोध घेत त्याला योग्य वळण देण्याचे काम याच वयात शिक्षक विद्यार्थ्यांना करत असतो. आणि यातुनच विद्यार्थ्यांनी आज विज्ञान प्रदर्शनीचे विज्ञानावर आधारित विविध प्रात्याक्षिके सादर केली आहे. यातुन या विद्यार्थ्यांची कल्पकता लक्षात येत आहे. शिक्षकांनीही अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे ते यावेळी म्हणाले. अनेक विद्यार्थ्यांनी विविध चविष्ट खाद्य पदार्थ तयार करत या खाद्य प्रदर्शनीत ठेवले आहे. यातुन विद्यार्थ्यांना कुकिंग क्षेत्राची आवड असल्याचेही लक्षात येत आहे. आपल्यात असलेल्या या कौशल्याचा आपल्याला भविष्यात नक्कीच लाभ होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंध्द आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here