*अखेर पिपरबोडी येथे ग्रामस्थांनी घेतला दारुबंदी चा निर्णय*

0
27

============================

*हनुमान मंदिर देवस्थान व चिनोरा तंटामुक्त समिती चा पुढाकार*

========================

*वरोरा प्रतिनिधी धर्मेंद्र शेरकुरे*

=======================

– वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिनोरा (पारधी टोला) पिपरबोडी येथे अखेर ग्रामस्थांनी दारूबंदी चा एकमताने निर्णय घेण्यात आला, चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत पारधी टोला पिपरबोडी हे लहानसे गाव आहे, जेमतेम गावची तिनसे लोकसंख्या , परंतु चार चार घरी दारु विक्री, यातच किशोर वयातील मुले दारूच्या आहारी गेले गावातील महिला दारूड्या पतीच्या ञासापाई कंटाळलेल्या होत्या, दारुच्या व्यसनात लिन झाले होते,श्री हनुमान मंदिर देवस्थान कमेटिच्या पदाधिकाऱ्यांनी दारु विक्रेत्यांना एका महिन्या अगोदर दारूबंदी बाबत सुचनाही दिल्या होत्या, अनेकदा आपण आपआपसात भांडण तंटे व्हायचे पोलिस स्टेशन कोर्ट कचेरी च्या चकरा व्हायच्या, दिनांक १६ फेब्रुवारी ला हनुमान देवस्थानचे पदाधिकारी, चिनोरा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गावातील चौकात सभा बोलावली,दारू विक्री या नंतर करू नये, केल्यास पोलीसांना तक्रार देण्यात येईल अशी दारूविक्रेत्यांना तंबी देण्यात आली, यानंतर गावात दारू आम्ही विकणार नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले, सभेला आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे,चिनोरा तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष सुशिला तेलमोरे, सदस्य गजानन भोयर, ञिशुल निबुधे, श्री हनुमान मंदिर देवस्थान चे अध्यक्ष रवींद्र शेरकुरे, उपाध्यक्ष नेपाल शेरकुरे,वामण नन्नावरे,सदाशिव नन्नावरे, दिवाकर नन्नावरे, राजेश्वर नन्नावरे, प्रमोद घोसरे ,वामण नन्नावरे, प्रवीण नन्नावरे, अमोल घोसरे,व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here