चंद्रपूर : मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यात दोनवेळा पुराचा फटका जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांना बसला. जिल्ह्यातील वरोरा – भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जनजीवन विस्करीत झाले आहे. येथील मोठ्या प्रमाणात घरांची पाण्यामुळे पडझड झाली. शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी आमदार प्रतिभाताई यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह जिल्हा प्रशासनासोबत ऑनफिल्ड पाहणी केली.
आज भद्रावती तालुक्यातील पिपरी, पाटाळा, माणगांव, पळसगांव, कोंडा तर वरोरा तालुक्यातील करंजी येथे भेटी दिल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिंदे, वरोरा – भद्रावती येथील तहसीलदार, आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियन्ता कुम्भे साहेब भद्रावती उपविभागीय अभियंता मत्ते, भद्रावती उपविभागीय अभियंता मेंढे यांच्यासह अन्य अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वरोरा – भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. त्यासोबतच तालुक्यातील मोठा भाग हा ग्रामीण आहे. या भागातील सुमारे ३३९ घरांची पडझड झाली आहे. त्यांच्या निवासाचा प्रश्न हा निर्माण झाला आहे. त्यासोबतच शेतकरी शेतीसोबत पाळीव जनावरे देखील पाळत असतात. परंतु या पुरामुळे त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे वरील बिकट परिस्थितीचा विचार करता शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याची गरज आहे.तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793