स्कॉलर सर्च अकॅडेमी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींची इंडस्ट्रियल विजिट

0
30

=========================

*कोरपना*

===========================

कोरपना : स्कॉलर सर्च अकॅडेमी ज्युनिअर कॉलेज, कोरपना येथील विद्यार्थिनींनी नुकतीच एम्ब्रोईडरी अँड स्टिचिंग क्लस्टर, चंद्रपूर येथे इंडस्ट्रियल विजिटला भेट दिली. या भेटीमध्ये विद्यार्थिनींनी एम्ब्रॉयडरी आणि स्टिचिंग उद्योगाची उत्पादन प्रक्रिया जवळून पाहिली.

============================

विद्यार्थिनींना विविध औद्योगिक मशीन्स, त्यासाठी लागणारे साहित्य, कच्चामाल आणि पक्का माल याबद्दल सखोल माहिती देण्यात आली. तसेच उद्योग उभारण्यासाठी लागणारी साधनसामग्री आणि आर्थिक नियोजन याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व मार्गदर्शन एम्ब्रोईडरी अँड स्टिचिंग क्लस्टरमधील कर्मचारी मीनाक्षी काकडे, स्नेहल काटकर आणि संगीता येरकडे यांनी केले.

==========================

क्लस्टरचे चेअरमन श्री. इंजिनियर दिलीप झाडे यांनी विद्यार्थिनींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी प्रॅक्टिकल लाईफ आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी अशा इंडस्ट्रियल विजिटचे महत्त्व अधोरेखित केले. अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या कामाबद्दलचा आत्मविश्वास वाढतो असेही ते म्हणाले.

==========================

या औद्योगिक भेटीसाठी शाळेच्या सहाय्यक शिक्षिका ज्योत्स्ना दहागावकर, दीपाली लिंगजवार, विशाल मालेकर आणि गिरधर कोटे यांनी मार्गदर्शन केले. या भेटीचे आयोजन शाळेचे संस्थापक श्री. इंजिनियर दिलीप झाडे आणि प्राचार्य श्री. राहुल उलमाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यातआले होते.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here