=============================
*वडिलांने 2 मुलीसह, पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, गावात भीतीचे वातावरण.*
====≠=======================
नागभीड—-नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौशी (बाळापूर )येथील वडील अंबादास लक्षमन तलमले वय 50 वर्षे याने स्वतःची पत्नी सह 2 मुलीची हत्या केली असल्याचा प्रकार आज दिनांक 3 मार्च 2024 सकाळी 6=00 वाजता उघडकीस आला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वडील आरोपीस पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
मौशी येथील अंबादास, पत्नी अल्का वय 40 वर्ष मुली तेजस्विनी वय 20 वर्ष, प्रणाली वय वर्ष 17 व
अनिकेत वय 15 असे चार व्यक्ती घरी राहत होते मोठ्या एका मुलीचे लग्न झाले होते, वडील अंबादास हा व्यसनधी असल्याने नेहमी पत्नीला पैसे मागायचा आणि दारू प्यायचा. घटनेच्या दिवशी वडील यांने हत्या करून सकाळी 5=00 वाजता बाहेर गेला आणि 6 वाजता बाहेरून आला असता आरोपीचा मुलगा अनिकेत हा वर्ग 10 वीत असल्याने अभ्यास करुण बाहेर फिरण्यास गेलेला होता, घरी आल्यावर हा प्रकार दिसला ,यांने काका नामदेव तलमले याला झालेला प्रकार सांगितला. लगेच आरोपीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी न झाल्याने गावाकर्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पत्नी व 2 मुली यात एक 12 वी ची परीक्षा देत असल्याचे कळते तर मुलगा 10 वी परीक्षा देत आहे. पत्नी व मुली यांचे घटना स्थळावर पंचनामे करून शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले असून घटना स्थळाला पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब, अप्पर पो अधीक्षक रीना जनबंधू, उप विभागीय पो अधिकारी दिनेश ठोसरे साहेब, पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी भेट दिली असून आरोपीस अटक करून अपराधक्र 75 /2024 अन्वये गुन्हा दाखल करून कलम 302 भा, द वी अटक करून पुढील तपास ठाणेदार विजय राठोड करीत आहे.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,