*शरणमं बहुउद्देशिय संस्थेतर्फे भटक्या गरजू परिवारांना कपडे भेट*

0
25

===========================

    *चंद्रपूर*

============================

*चंद्रपूर (का. प्र.) – परराज्यातून येऊन शहराबाहेरील ओसाड जागेवर झोपड्या बांधून वास्तव्य करणाऱ्या व पोटाची भूक भागविण्याकरिता झाडू व फळे बनउन त्यांची अतिशय क्षुल्लक दरात विक्री करणाऱ्या परिवारांना शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे कपडे भेट देण्यात आले. राज्यात चंद्रपूर सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे येथील नागरिक उन्हाळ्यात आपली विशेष काळजी घेतात. एसी.कुलरचा वापर करून वाढत्या तापमानापासून आपला बचाव करतात.परंतु या परिवारांना राहण्यासाठी घर आणि झोपण्यासाठी साधी दरिही नाही.उन्हाच्या झळा सोसत दिवसभर काम करत हे परिवार आपल्या दोन वेळच्या जेवणाची कशीबशी व्यवस्था करतात. लहान मुले व महिलांचे हाल बघवत नाही.प्रचंड उन्हातही त्यांच्या डोक्यावर छप्पर नसल्यामुळे फुटपाथ वर बसून बाजूच्या काटेरी झुडपाच्या सावलीचा आश्रय घेत दिवस काढत आहेत. डोक्यावर छप्पर नाही,खायला पुरेसे अन्न नाही,अंगावर व्यवस्थित कपडे नाही,मुलांना शिक्षणाचा पत्ता नाही,महिलांना आरोग्याच्या विविध समस्याचा सामना करीत जीवन जगावे लागत आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेऊन शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे सदर परीवारांना कपडे भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा परिचय देण्यात आला.महिलांना साड्या,पुरुषांना शर्ट पँट व लहान मुलांना ड्रेस देण्यात आले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. या परिवारांच्या मदतिकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर तावाडे यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे सचिव श्री हर्षित भसारकर, कोशाध्यक्ष कु.स्मिता पेरके, ऋतूराज तावाडे,गौरव शेंडे,तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.*

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here