============================ *चंद्रपूर* ==================== सर्व संडे मार्केट मधील व्यावसायिक यांना कळविण्यात येते की, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर मनपा हद्दीतील आझाद बगीचा जवळ, जयंत टॉकिज चौक ते ख्रिश्चन कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दर रविवारला ‘संडे मार्केट’ या नावाने बाजार भरत असुन त्यात विविध तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने. हातठेले, फेरिवाल्यांची दुकाने लावण्यात येत असतात. ============================== येत्या रविवारी दि. १४/०४/२०२४ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असुन या निमित्याने शहरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या मिरवणुकी निघत असल्याने, सदर भागातील तसेच मुख्य रस्त्यावरील नागरिकांची प्रचंड गर्दी / वर्दळ / वाहतुक होणार आहे करिता ‘संडे मार्केट’ मधील गर्दीमुळे काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ============================ त्यामुळे सदर ठिकाणी दर रविवारला भरणारा ‘संडे मार्केट’ दि. १४/०४/२०२४ ला बंद ठेवण्यात यावा. याची सर्वांनी नोंद घ्यावी. (मा. अति. आयुक्त, चंशमनपा, चंद्रपुर यांचे मान्यतेने) ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =========================== संपादक :- शशि ठक्कर , 9881277793उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,