============================
शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांसाठी गांधी चौकात सरबत वाटप
==========================
*चंद्रपूर*
==========================
राम नवमी निमित्त शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वितरण करत राम नवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे यंग चांदा ब्रिगेड च्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सविता दंडारे, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, आशा देशमुख, कल्पना शिंदे, वैशाली मेश्राम, दुर्गा वैरागडे, विमल कातकर, सोनाली आंबेकर, अस्मिता डोणारकर, शुभांगी डोंगरवार, वैशाली मद्दीवार, आशु फुलझेले, युवा नेते अमोल शेंडे रोशेद हुसेन,चंद्रशेखर देशमुख, नकुल वासमवार, विश्वजीत शाहा, हेरमन जोसेफ, गौरव जोरगेवार, करणसिंह बैस, राम जंगम, नितेश गवळी, आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शोभायात्रा गांधी चौकात पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेतील श्री प्रभु राम यांच्या प्रतिमेला आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पहार अर्पण करुन पुजा केली. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांसाठीही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पिण्याचे पाणी आणि शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रेचे स्वागत केल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार आणि यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेही शोभायात्रेत सहभागी झालेत.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,