ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आजोळी दमदार स्‍वागत बोरगावातील नागरिकांच्‍या प्रतिसादाने झाले भावूक

0
23

==============================

चंद्रपूर, दि. 17 एप्रिल 2024 : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांचे यवतमाळ जिल्ह्यातील त्‍यांच्‍या आजोळी म्‍हणजेच बोरगावात दमदार स्‍वागत झाले.
=============================
गावात प्रवेश करताच बंजारा समाजातील बांधवांनी पारंपरिक डफली वादन करून व भगिनींनी त्‍यांचे औक्षण करून स्‍वागत केले. यावेळी जोरदार फटाक्‍यांची आतषबाजी करण्‍यात आली. नागरिकांच्‍या या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादाने ना. मुनगंटीवार काही क्षण भावूक झाले. मला आज माझ्या आजोळी प्रचार करण्‍याची संधी मिळाली, त्‍यासाठी मी स्‍वत:ला खूप भाग्‍यवान समजतो, असे ना. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.
============================
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव हे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मातोश्री चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे माहेर आहे. लहानपणी शाळेला सुट्ट्या लागल्‍या की ते उन्हाळ्यात महिनाभरासाठी आजोळी मुक्कामाला येत असत. गावचा नातू ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा भन्नाट प्रवास केलेल्‍या ना. सुधीर मुनगंटीवार यांची आजोळबद्दलची ओढ जाहीर सभेच्‍या निमित्‍ताने परत एकदा बोरगाववासियांनी अनुभवायला मिळाली. यावेळी झालेल्‍या जाहीर सभेत त्‍यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्‍हणाले, लहानपणी येथील बंजारा समाजातील माता-भगिनींनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. गावक-यांचे माझ्यावर मोठे ऋण असून ते मला येथील लोकांचा विकास साधून फेडायचे आहे. भरघोस मतदान करून तुम्‍ही ती संधी द्याल, असा विश्‍वास आहे, असे ते म्‍हणाले.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here