रामनगर पोलिसांनी 4 घरफोडी करणाऱ्या मास्टरमाईंड ला केली अटक

0
154

चंद्रपूर- रामनगर पोलीस स्टेशन मधील स्थानिक गुन्हे शोध पथकाने महत्वाची कामगिरी बजावत 4 घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे . म्हाडा कॉलनी दाताला येथे घरात प्रवेश करीत लोखंडी आलमारीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता , अश्या प्रकारे नेहरूनगर मध्ये सुद्धा घराचा दरवाजा उघडा असताना सोन्याचे दागिने व रोख असा एकूण 2 लाख 15 हजार रुपयांचा माल अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली होती .
गुन्ह्याचे गांभीर्य बघता रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांना गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले . सपोनि एकरे यांनी गुन्ह्यातील सर्व बाबी तपासून बघितल्या , सायबर सेल व गोपनीय माहिती गोळा करीत रेकॉर्डवरील आरोपी शामनगर येथील 24 वर्षीय अतुल विकास राणा याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हे केल्याची बाब कबूल केली . Chandrapur crime राणा ला विश्वासात घेत अधिक माहिती जाणून घेतली असता त्याने रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत 1 घरफोडी व पोलीस स्टेशन मूल मध्ये घरफोडी केली असल्याची कबुली दिली . घरफोडी केल्यावर त्यामधील रोख रकमेतून आरोपीने 1 लाख रुपयांची दुचाकी देखील घेतली , आरोपी राणा कडून 4 घरफोडी मधील 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे , उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे , सपोनि हर्षल एकरे , पोउपनी विनोद भुरले , रजनीकांत पुठ्ठावार , पेतरस सिडाम , किशोर वैरागडे , विनोद यादव , मरसकोल्हे , विकास जुमनाके , आनंद खरात , लालू यादव , भावना रामटेके , सायबर सेलचे मुजावर अली , प्रशांत लारोकर , छगन जांभुळे यांनी यशस्वीपणे पार पाडली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here