==============================
यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मृतकच्या कुटुंबींयांची भेट घेत आर्थिक मदत
==========================
लालपेठ चंद्रपूर
===========================
वन विभागाने खोदलेल्या खड्ड्यात बुडुन 15 वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. दरम्यान आज यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी मुख्य वरसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांची भेट घेत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोबतच वन विभागाचे मोकळे खड्डे संरक्षित करण्याची मागणी केली आहे.
==============================8
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी मृतक तनविर शेख याच्या राहत्या घरी जात कुटुंबीयांची भेट घेतली असून आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक करणसिंह बैस, देवा कुंटा, कार्तिक बुरेवार आदींची उपस्थिती होती.
===============================
चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात वन विभागाने गवत विकास प्रकल्पासाठी खड्डा खोदला होता. नंतर सदर प्रकल्प रद्द करण्यात आला होता मात्र ह्या खुल्या खड्ड्याला कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली नाही. दरम्यान रविवार दिनांक ०२.०६.२०२४ ला तनविर शेख आणि त्याचे मित्र या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी तनविर खड्ड्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला या अकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आघात झाला आहे.
=============================
वास्तविकतेमध्ये वन विभागाने खोदलेल्या सदर खड्ड्याभोवती संरक्षण भिंत बांधून,सुरक्षा रक्षक ठेवून खड्डा संरक्षित करणे अपेक्षित होते. मात्र अशा कोणत्याही उपायोजना करण्यात न आल्याने सदर दुर्घटना घडली आहे. वेकोलि आणि वन विभागाचे असे अनेक खड्डे मोकळ्या अवस्थेत असल्याने भविष्यात अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा धोकादायक खड्ड्यांचे सर्वेक्षण करून ते तात्काळ सुरक्षित करण्यात यावे. अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
==============================
तसेच घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदनही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मुख्य वरसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना दिले आहे.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356























