चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ता, मानवधिकार संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा व शिवसेना महिला आघाडिच्या महिला उपजिल्हा प्रमुख . निशा धोंगडे यांच्या कार्याची दखल घेऊन यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत गवळी व महिला प्रदेश अध्यक्षा ऍड अनिता गवळी यांनी एका पत्राव्दारे निशा धोंगडे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडिच्या उपाध्यक्ष पदी निवड केली आहे. यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठकाचे प्रदेश उपाध्यक्ष डी.के. आरीकर यांच्या हस्ते चंद्रपूर येथील विश्रामगृहात नियुक्तीपत्र देवून निशा धोंगडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर शहरचे जिल्हाध्यक्ष राजीव कवकड व सांस्कृतीक विभागाच्या शहर जिल्हाध्यक्ष ज्योती गमावार यांची उपस्थिती होती.
निशा धाँगडे यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले असुन, त्यांनी फॅशन डिझायनर, ब्युटीशियन, डान्स, अभिनय, नाटक, मराठी चित्रपट अशा विविध क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे व विविध क्षेत्रात पुरस्कारही मिळवलेले आहे. त्यामुळे ग्राहक चळवळीस ग्राहकांना निश्चितच न्याय मिळवुन देतील असा विश्वास डी. के. आरीकर यांनी व्यक्त केला आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793