इरई नदी दुथडी भरून वाहत आहे, असाच पाऊस सुरू राहिल्यास पूर येण्याची शक्यता
चंद्रपूर जिल्ह्यात काल (शुक्रवार) रात्री संततधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे इरई धरण भरले असून आज (शनिवार) सकाळी आठ वाजताचे सुमारास धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले.
इरई नदी दुथडी भरून वाहत आहे, असाच पाऊस सुरू राहिला तर नदीतील पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नदी काठावरील आठ वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा पूर आला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793