विद्यार्थिनीचा विनयभंग , शिक्षकास अटक ; चंद्रपूर येथील घटना

0
152

पीडित विद्यार्थिनी शहरातील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे . मागील एक महिन्यापासून शिक्षक तिचा विनयभंग करत होता .
चंद्रपूर : दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास रामनगर पोलिसांनी कलम 354 पोस्को , अॅट्रॉसिटी अॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे . अभिजीत मधुकर रागिट ( 36 ) असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे .
पीडित विद्यार्थिनी शहरातील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे . मागील एक महिन्यापासून शिक्षक तिचा विनयभंग करत होता . शेवटी सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने रामनगर पोलीस स्टेशन गाठून बुधवारी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली .
त्यानुसार रामनगर पोलिसांनी कलम 354 पोस्को अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अभिजीत रागीट यास अटक केली गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे . पुढील तपास चंद्रपूरचे एसडीपीओ सुधीर नंदनवार आहे

 

संपादक*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* :- शशी ठक्कर

9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here