धक्कादायक : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी ठार …

0
107

वाघांनी घेतले वर्षभरात 22 जणांचे बळी …

गडचिरोली दि , २६ : गडचिरोली शहरापासून अवघ्या ८ की.मी अंतरावरील दिभना येथे आणखी एक शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले आहे . नीलकंठ गोविंदा मोहर्ले वय 52 वर्षे असे या शेतकऱ्याचे नाव आहे . नीलकंठ यांच्या शेतालगत जंगल असून ते शेताच्या बाजूला अळिंबीची ( टेकोडे ) ही रान भाजी काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला . या हल्ल्यात नीलकंठ यांचा जागीच मृत्यू झाला . गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे . वन विकास महामंडळाच्या ब्रम्हपुरी विभागात असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील खंड क्रं . 2 मध्ये आज दुपारी २.३० ते ३:०० वाजण्याच्या सुमारास दिभना- अर्मिझा रोड लगत नीलकंठ मोहर्ले हे आपल्या शेतावर गेले होते , नीलकंठ हे त्यांच्या शेतलागत असलेल्या जंगलात अळिंबीची ( टेकोडे ) ही भाजी काढत होते . यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले . घटनास्थळी वन विकास महामंडळाचे अधिकारी , कर्मचारी आणि गडचिरोली पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत . गेल्या वर्षभरात गडचिरोली आणि वडसा वन विभागात तब्बल २२ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे . तर दिभना गावातील हा वर्षभरातील चौथा बळी गेला आहे . आरमोरी , गडचिरोली वनपरिक्षेत्रातील असलेल्या जेप्रा , महादवाडी , चुरचुरा , दिभना या जंगलाच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे . विशेष म्हणजे वन विभागाच्या PRT ( primary response team ) पथकाच्या माध्यमातून जंगल परिसरातील शेतकऱ्याना वाघांच्या हल्ल्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते . मात्र सध्या शेतीची कामं असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाणे भाग असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते . सातत्याने वन विभागात वाघाच्या हल्ल्यात वाढ होत असल्याने नरभक्षक वाघांचं बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here