चंद्रपूर व वरोऱ्यात कांग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

0
66

चंद्रपूर : लोकशाहीप्रधान देशात सत्ताधारी आणि विरोधक यांना तेवढेच महत्वाचे स्थान आहे . परंतु , देशात सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारला विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य नाही . यातून विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे .
त्यासाठी मोदी सरकार केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करीत असल्याचा • आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश ( रामू ) तिवारी यांनी केला . Congress news काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्त वसुली संचालनालय ( ईडी ) वतीने चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे . त्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीने शांततापूर्ण सत्याग्रह करण्याचे निर्देश दिले होते . त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ( ता . २६ ) सकाळी ११ वाजता शहरातील गांधी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले . यावेळी श्री . तिवारी बोलत होते . National herald तत्पूर्वी , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून दडपशाही करीत असून , काँग्रेसला झुकवू पाहात आहे . परंतु , ते शक्य नाही . ७५ वर्षांच्या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला केंद्र सरकार माणुसकीशून्य पद्धतीने त्रास देत आहे . सत्तेचा अहंकार चढलेल्या भाजपला देशात विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य नाही . त्यामुळे केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचत आहे . लोकशाही देशात ही अघोषित हुकूमशाही सुरू असून मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात हे आंदोलन आहे . या आंदोलनातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत असल्याचे उपस्थित अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले . काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्त वसुली संचालनालयाने ( ईडी ) चौकशीसाठी आज पुन्हा बोलविले होते . त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत . चंद्रपुरातही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच काळ्या फिती लावून निषेध नोंदविला . या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के . के . सिंग , घनश्याम मुलचंदानी , महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीताताई अमृतकर यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी , महिला काँग्रेस , युवक काँग्रेस , एनएसयुआय , अनुसूचित जाती विभाग , ओबीसी विभाग , अल्पसंख्याक विभागासह अन्य विभाग व सेलचे अध्यक्ष , पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
वरोरा : महागाई , बेरोजगारी देशात वाढत आहे . देशातील स्वायत्त संस्था नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने विकायला काढलेल्या आहेत . भाजपने सर्वसामान्य जनतेवर अन्याय कारक Gst लादला आहे .
केंद्रातील भाजप सरकारच्या याच दडपशाही व जनविरोधी निर्णयांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते खासदार rahul gandhi सातत्याने आवाज उठवत आहेत . हे आपले पाप , आपले अपयश लपविण्यासाठी फक्त राजकीय द्वेषातून केंद्रातील भाजप सरकार सोनिया गांधींवर ईडीमार्फत कारवाई करत आहे , असा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला आहे . Sonia gandhi ed खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रोषनी मकवाने यांना निवेदन सादर केले . केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला . तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर , माजी नगराध्यक्ष विलास टिपले , बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे , माजी गटनेते गजानन मेश्राम , माजी पं.स. सभापती रवींद्र धोपटे , राजू महाजन , मनोहर स्वामी , प्रदीप बुराण , निलेश भालेराव , छोटु शेख , अनिल झोटींग , शुभम चिमुरकर , सुरज गावंडे , सुनंदा जीवतोडे , दिपाली माटे , रत्ना अहिरकर , मंगला पिंपळकर , शिरोमणी स्वामी , ऐश्वर्या खामनकर , मिना रहाटे , चेतना शेट्टे , सुभाष दांदले , सलीम पटेल , सनी गुप्ता , पंकज नाशिककर , प्रमोद काळे , राहील पटेल , प्रफुल्ल आसुटकर , राहुल देवळे , हरिभाऊ भाजीपाले , निसार पठाण , मनोज पेंदोर , सुजीत कष्टी , सन्नी गुप्ता , कातकर आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते . Enforcement Directorate केंद्रातील मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस नेते राहुल गांधी , सोनिया गांधी यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून लक्ष करीत असल्याचा आरोप करुन वरोरा काँग्रेसने आज सत्याग्रह आंदोलन केले . Congress protest भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला . ‘ ईडी से हम नहीं डरेंगे … देश की खातिर की लड़ते रहेंगे ‘ ‘ हुकूमशाही केंद्र सरकारचा निषेध असो ‘ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here