चंद्रपुरात साजरा करण्यात आला ‘ कारगिल विजय दिवस “

0
53

चंद्रपूर – माजी सैनिक कल्याण बहुउद्देशीय संस्था तसेच माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” कारगील विजय दिवस ” व सैनिक संमेलनाचे उदघाटन दि २६ जुलै रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते पार पडले .
यावेळी आपल्या संबोधनात ऐतिहासिक अशा कारगील विजय दिवसाच्या व भारतीय सेनेच्या अतुलनीय साहसाचे स्मरण करून या लढ्यात देशासाठी वीरगती प्राप्त सैनिकांच्या स्मृतीस नमन केले . याप्रसंगी सुभेदार शंकर मगरे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले . kargil vijay diwas 2022 आपल्या संबोधनात अहीर यांनी चीन ची विस्तारवादी भूमिका , पाकिस्तानच्या आतंकी कारवाया व बांगलादेशातून होणारी घुसखोरी आदि बाबींवर प्रकाश टाकत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ इच्छाशक्ती व सैन्यशक्तीला दिलेल्या खुल्या मुभेमुळे या सर्व कारवाया नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाल्याचे भाष्य करीत कारगील विजय दिवसानिमित्त सैनिक , कुटुंबियांना व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे , माजी महापौर राखीताई कंचर्लावार , ऍड पुरुषोत्तम सातपुते , देवानंद वाढई , पप्पू देशमुख यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here