विधानसभेचे विरोधीपक्ष नेता अजित पवार 28 जुलै ला चंद्रपूर जिल्ह्यात

0
31

चंद्रपूर गेल्या 15 दिवसात विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा अनेक जिल्ह्याला फटका बसला , इतकेच नव्हे तर अतिवृष्टी मध्ये आलेला महापूर यामुळे विदर्भातील शेती अक्षरशः पाण्याखाली गेली .
याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार 28 जुलैला चंद्रपूर , गडचिरोली व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे .
अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली , पुराच्या पाण्यामुळे पीक बुडाले होते , 15 जुलै ला प्रत्यक्ष दौऱ्याची विनंती करीत पूर परिस्थिती ची पाहणी करून मदतीसाठी शासनदरबारी ही व्यथा मांडायची असल्याने 28 जुलै ला विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजित पवार व राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तिन्ही जिल्ह्यात जात पाहणी करणार आहे . या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुके , चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात शेतीची पाहणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कांग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी प्रसिद्धीपत्रक द्वारे दिली आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here