अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0
61

सिंदेवाही : शहरातील अल्पवयीन पीडीतेच्या घराशेजारी राहत असलेल्या आरोपीने रात्रीचा फायदा घेत अल्पवयीन असलेले पिडीते सोबत लैंगीक अत्याचार केला त्याआधारे आज मंगळवार 26 जुलै ला सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे .
आरोपी 2022 या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात च्या रात्रो अंदाजे २ वाजताच्या सुमारास अल्पवयीन असलेल्या पिडीतेच्या घरी जाऊन पिडीतेचे दोन्ही हात पकडून तोंड दाबून जबरदस्ती करून शारीरिक संबंध केला . आरोपीने पिडीतेला ही बाब जर कोणालाही सांगितली तर मी तुला जीवे मारणार अशी धमकी दिली होती . अशी तक्रार अल्पवयीन पीडीतेने आज मंगळवार 26 जुलै पोलीस स्टेशनला सांगितले त्याआधारे सिंदेवाही पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन आरोपीला अटक केली आहे . आरोपीवर अप क . १ ९९ / २०२२ कलम ३७६ ( १ ) , ३७६ ( २ , J ) , ४५० , ५०४ , ४ सहकलम पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक घारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक फुलेकर मॅडम करीत आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here