मंकी पॉक्सबाबत घ्यावयाची काळजी आणि नियंत्रण उपाययोजना

0
55

चंद्रपूर : केरळमध्ये मंकी पॉक्स आजाराचे दोन रुग्ण नुकतेच आढळले आहेत . या पार्श्वभूमीवर या आजाराचे सर्वेक्षण प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे . मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे .
1970 मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो येथे आढळला . मंकी पॉक्स हा आजार आर्थोपॉक्स व्हायरस या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो . काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो . हे प्राणी या विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत आहे . या आजाराचा अधिशयन कालावधी 6 ते 13 दिवस , तथापि , हा कालावधी 5 ते 21 दिवसापर्यंत असू शकतो . रुग्णाचा संसर्गजन्य कालावधी हा अंगावर रॅश उठण्यापूर्वी 1-2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो .
असा होतो मंकी पॉक्सचा प्रसार : : माणसापासून माणसास थेट शारीरिक संपर्क , लैंगिक संपर्क किंवा जखम , घाव यातील स्त्राव . संपर्क बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत , जर खूप वेळा बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे . बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो .
मंकी पॉक्स रुग्णाची व्याख्या : मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी मंकी पॉक्सचा एक रुग्ण देखील साथरोग उद्रेक आहे . अशा प्रत्येक रुग्णाचे अन्वेषण शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत करण्यात यावे . मंकी पॉक्स रुग्णांचे प्रयोगशाळेत नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था , पुणे यांना पाठविण्यात यावे . प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे . मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी , रुग्णालयातील सर्वेक्षण प्रत्येक रुग्णालयातील त्वचा व गुप्तरोग विभाग , मेडिसिन आणि बालरोग विभागातील सर्वेक्षणावर भर द्यावा . तसेच गोवर , रूबेला सर्वेक्षण करणारी पथके यांचा सहभाग घ्यावा . राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील जोखमीच्या लोकसंख्येच्या नियमित सर्वेक्षणातून महत्वपूर्ण माहिती मिळू शकते या दोन बाबी मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी महत्त्वाच्या आहेत .
मंकी पॉक्स रुग्णाची व्याख्या : मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी मंकी पॉक्सचा एक रुग्ण देखील साथरोग उद्रेक आहे . अशा प्रत्येक रुग्णाचे अन्वेषण शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत करण्यात यावे . मंकी पॉक्स रुग्णांचे प्रयोगशाळेत नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था , पुणे यांना पाठविण्यात यावे . प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे . मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी , रुग्णालयातील सर्वेक्षण प्रत्येक रुग्णालयातील त्वचा व गुप्तरोग विभाग , मेडिसिन आणि बालरोग विभागातील सर्वेक्षणावर भर द्यावा . तसेच गोवर , रूबेला सर्वेक्षण करणारी पथके यांचा सहभाग घ्यावा . राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील जोखमीच्या लोकसंख्येच्या नियमित सर्वेक्षणातून महत्वपूर्ण माहिती मिळू शकते या दोन बाबी मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी महत्त्वाच्या आहेत . monkeypox news मंकी पॉक्स आजाराची लक्षणे : what is monkey pox virus रोगी 2 सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून ते 4 आठवड्यात बरा होतो . तथापि , लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो . या आजाराचा मृत्यूदर सर्वसाधारणपणे 3 ते 6 टक्के आहे . ताप , लसिका ग्रंथींना सूज ( कानामागील , काखेतील व जांघेतील लसिका ग्रंथीना सूज येणे ) , डोकेदुखी , अंगदुखी , थंडी वाजणे , घाम येणे , घसा खवखवणे आणि खोकला ही लक्षणे दिसून येतात . कुपोषण , कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या समुदायांमध्ये मंकी पॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो . मंकी पॉक्स सदृश्य इतर आजारामध्ये कांजण्या , नागिन , गोवर सिफिलिस- दुसरी स्टेज , हॅन्ड , फूट माऊथ डिसीज आदीचा समावेश होतो . मंकी पॉक्समध्ये होणाऱ्या गुंतागुंतीमध्ये इतर संसर्ग , निमोनिया , सेप्सिस , मेंदूतील गुंतागुंत , दृष्टीपटलाचा संसर्ग यामध्ये दृष्टी देखील जाऊ शकते . symptoms of monkeypox प्रयोगशाळा निदान करतांना संशयित मंकीपॉक्स रुग्णांचे नमुने घेताना पीपीईचा वापर करावा . रक्त , रक्तद्रव , फुटकळ्यातील द्रव आणि मूत्र हे नमुने निदानासाठी पाठविले जातात . राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था , पुणे येथे मंकी पॉक्ससाठी प्रयोगशालेय नमुने पाठविणे आवश्यक आहे . सॅम्पल पाठवितांना एन . आय . व्ही मधील डॉ . प्रज्ञा यादव 020 260061111 आणि डॉ . रीमा सहाय 020-26006160 या तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे . तसेच सॅम्पल पाठवितांना एन . आय . व्ही , पुणे येथे आयडीएसपी महाराष्ट्र यांना ssumaharashtra@gmail.com या ईमेलवर कळवावे .
मंकी पॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्या घरी वेगळ्या खोलीमध्ये ठेवणे आवश्यक आहे . या ठिकाणी स्वतंत्र वायूविजन , वेंटिलेशन व्यवस्था असावी . रुग्णाने ट्रिपल लेयर मास्क लावणे आवश्यक आहे . रुग्णाच्या कातडीवरील पुरळ , फोड नीट झाकले जावेत यासाठी त्याने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पॅन्ट वापरावेत . जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ , फोड पूर्णपणे बरे होत नाही आणि त्यावरील खपल्या गळून जात नाही तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे . रुग्णाला लक्षणानुसार उपचार द्यावा , पुरेशा प्रमाणात हायड्रेशन मिळेल याची दक्षता घ्यावी . रुग्णांमध्ये डोळ्यात वेदना अथवा दृष्टी अधू होणे . श्वास घ्यायला त्रास होणे छातीत दुखणे . शुद्ध हरवणे , झटके येणे लघवीचे प्रमाण कमी होणे रुग्णाने तोंडावाटे काहीही अन्नपाणी न घेणे . रुग्णास प्रचंड थकवा जाणवणे आदीप्रकारे गुंतागुंत निर्माण झाल्यास ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्यावा अथवा त्याला संदर्भित करावे . Monkey pox india मंकी पॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी : मंकी पॉक्स टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे . मंकी पॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी संशयित मंकी पॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे . रुग्णाच्या कपड्यांची अथवा अंथरून पांघरूणांशी संपर्क येऊ न देणे . हातांची स्वच्छता ठेवणे . आरोग्य संस्थांमध्ये मंकी पॉक्स रुग्णावर उपचार करतांना पीपीईचा वापर करणे . मंकी पॉक्स आजाराचा प्रसार टाळणे म्हणजे त्या रुग्णाला वाळीत टाकणे नव्हे हे लक्षात घेणे देखील आवश्यक आहे . रोगप्रसार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन रुग्णाची निगा राखली जावी , आदी मंकी पॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे . याप्रकारे कार्यक्षेत्रात मंकी पॉक्स सर्वेक्षण प्रतिबंध आणि नियंत्रण विषयक उपाययोजना अमलांत आणाव्यात , असे आवाहन आरोग्यसेवा संचालक डॉ . नितीन अंबाडेकर यांनी केले आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here