सैनिकांनी पक्षप्रमुखापुढे सादर केले प्रतिज्ञापत्र

0
62

चंद्रपूर – महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी मोठे खिंडार पाडत पक्षाचे 40 आमदार फोडले , सर्व आमदारांना सोबत घेत शिंदे यांनी भाजपशी युती करीत राज्याचे मुख्यमंत्री बनले . आमदार गेल्यावर पक्षाचे 18 पैकी 12 खासदारांनी सुद्धा शिंदे गटाला पाठिंबा दिला .
मात्र त्यांनंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे न डगमगता पक्ष पदाधिकार्या सोबत संवाद साधत शिवसेना पुन्हा उभी करू असे आश्वस्त केले . 27 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस , मात्र कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत आपण सर्व पक्षासोबत एकनिष्ठ आहात याबाबत प्रतिज्ञापत्र माझ्याकडे सोपवा तेच माझ्या वाढदिवसाची मोठी भेट राहणार असे आवाहन केले . 27 जुलैला मातोश्री वर शिवसैनिकांनी एकच गर्दी करीत हजारोंच्या संख्येने पक्ष प्रमुखापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले . चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी मुंबई गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चंद्रपूर जिल्ह्यातून तब्बल 3 हजारांच्या वर एकनिष्ठतेची प्रतिज्ञापत्र सादर केली . व आम्ही सदैव शिवसेना पक्षाशी प्रामाणिक राहणार अशी शपथ सुद्धा घेतली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here