सुधिरभाऊंचा वाढदिवस ठरला मच्छीमार कुटूंबांना वरदान …… राकेश बोमनवार

0
49
चंद्रपूर (का.प्र.)
स्थानिय रामाळा तलाव निर्मीतीपासुन ते आजतागायत चंद्रपुरकरांसाठी अभिमानास्पद बाब राहीली आहे. एर्कोनिया  वनस्पतीच्या प्रादुर्भावाने संपूर्ण तलावाची अत्यंत वाताहत होउन तलाव नष्टप्राय झाला होता. तलाव वाचवण्यासाठी सर्वच चंद्रपुरकरांनी वेळोवेळी आंदोलने केली त्यांची फलश्रुती तलाव खोलीकरणात झाली हा इतिहास आहे. मागील दोन वर्षे कोविड १९ ने बेचिराख
केली.
सन् २०२२ हा सर्व समाजवर्गासाठी सावरण्याचं  वर्ष आहे परंतु शहरातील मच्छीमार समाज  वर्गासाठी  मात्र ठणठणीत  कोरडा तलाव नशिबी होता. असंख्य
मच्छीमार कुटूंबे याच व्यवसायावर उदरनिर्वाह करतात अश्यातच जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने
तलाव तुडूब भरला,
भा. ज. पा.  महानगर सचिव जलनगर निवासी सामाजिक कार्यकर्ते राकेश बोमनवार हे सतत मच्छीमार समाजातील प्रत्येक कुटूंबात वेळोवेळी त्याच्या अडचणी व समस्या सोडवण्यात अग्रेसर असतात. आता जर मत्स्य बिजारोपन केले तर पुढील सहा महिन्यात दिड किलोची मासळी मिळेल. हा आशावाद वाल्मीकी मछुआ सहकारी संस्था ने राकेश बोमनवार यांचेकडे ठेवला बोमनवारांनी  ही बाब आमदार सुधिरभाऊंना विषद केली. भाऊनी तातडीने दखल घेत. जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेऊन या प्रस्तावावर चर्चा करून  सर्वानुमते  त्याला  मंजुरी प्रदान करून मच्छीमार कुटूंबाचे उदरनिर्वाहाचा मार्ग प्रशस्त
करून  दिला .
राकेश बोमनवारच्या नेतृत्वात सुधिरभाऊच्या वाढदिवशी  रामाळा तलाव येथे दुपारी १ वाजता भा.ज.पा. महानगर जिल्हाध्यक्ष
डॉ. मंगेश गुलवाडे , माजी महापौर राखी कंचर्लावार ,  भा. ज. पा. कोषाध्यक्ष  प्रकाश धारणे,  संतोष झा, शंकर गुमलवार, किशोर मंचर्लावार, नामदेव
मगडीवार, कैलाश मंचर्लावार, भा.ज.पा. माध्यम सह प्रमुख देवा बुरडकर, प्रकाश परमार  सह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भगवान वाल्मिकी यांच्या प्रतिमेला हारार्पण, पुजन व सुधीरभाऊंचा वाढदिवसाचा केक कापून  मत्स्य बिजारोपन करण्यात आले. या प्रकल्पा मुळे येत्या सहा महिन्यात शेकडो टन मासळीचे उत्पन्न मिळेल व मच्छीमार कुटूंबाना रोजगार मिळेल.  यात शंका नाही .
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here